शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस आयुक्तालय १ जानेवारीपासून?

By admin | Updated: April 16, 2016 00:44 IST

मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ : प्रस्ताव पोलिस महासंचालकांसमोर

कोल्हापूर : गुन्हेगारांसह टोळ्यांवर ‘मोक्का,’ हद्दपारीसारख्या गंभीर कारवायांचे थेट अधिकार प्राप्त व्हावेत, तसेच पोलिस प्रशासनावरील कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, यासाठी कोल्हापुरात १ जानेवारी २०१७ पासून पोलिस आयुक्तालय सुरू करण्यासाठी गृहखात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. आयुक्तालयाचा प्रस्ताव राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दिक्षीत यांच्यासमोर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात येणार आहे. या समितीने आर्थिक तरतुदीसंदर्भात अहवाल दिल्यानंतर आयुक्तालयाच्या प्रस्तावास मंजुरी दिली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याने दिली. राज्य शासनाने नुकतेच अकोला येथे पोलिस आयुक्तालय केले आहे. महापालिका असलेल्या शहरांमध्ये पोलिस आयुक्तालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोल्हापूरलाही पोलिस आयुक्तालय सुरू करण्याचा प्रयत्न गृहविभागाचा आहे. कोल्हापुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. या सगळ्यांचा विचार करून तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव तयार केला. तो विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याकडे सादर केला असता त्यांनी त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे नमूद करून तो प्रस्ताव मागे पाठविला. डॉ. शर्मा यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी बदली झाल्याने त्यांनी पदभार सोडण्यापूर्वी पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावातील त्रुटींमध्ये सुधारणा केली. नवे वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे हेही आयुक्तालय सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयुक्तालयाचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव पोलिस महासंचालकांना सादर केला. या प्रस्तावामध्ये पोलिस आयुक्तालयासाठी नियोजित जागा म्हणून सध्याची पोलिस मुख्यालयाची नवीन इमारत देण्याचे नियोजन केले आहे. पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र कोल्हापूर व इचलकरंजी शहर असे निश्चित करण्यात आले आहे. गृहविभागाकडून कोल्हापुरात दि. १ जानेवारी २०१७ पासून आयुक्तालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा प्रस्ताव पोलिस महासंचालक दीक्षित यांच्यासमोर आहे. पोलिस आयुक्तालय १ जानेवारीपासून?मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ : प्रस्ताव पोलिस महासंचालकांसमोर कोल्हापूर : गुन्हेगारांसह टोळ्यांवर ‘मोक्का,’ हद्दपारीसारख्या गंभीर कारवायांचे थेट अधिकार प्राप्त व्हावेत, तसेच पोलिस प्रशासनावरील कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, यासाठी कोल्हापुरात १ जानेवारी २०१७ पासून पोलिस आयुक्तालय सुरू करण्यासाठी गृहखात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. आयुक्तालयाचा प्रस्ताव राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दिक्षीत यांच्यासमोर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात येणार आहे. या समितीने आर्थिक तरतुदीसंदर्भात अहवाल दिल्यानंतर आयुक्तालयाच्या प्रस्तावास मंजुरी दिली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याने दिली. राज्य शासनाने नुकतेच अकोला येथे पोलिस आयुक्तालय केले आहे. महापालिका असलेल्या शहरांमध्ये पोलिस आयुक्तालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोल्हापूरलाही पोलिस आयुक्तालय सुरू करण्याचा प्रयत्न गृहविभागाचा आहे. कोल्हापुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. या सगळ्यांचा विचार करून तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव तयार केला. तो विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याकडे सादर केला असता त्यांनी त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे नमूद करून तो प्रस्ताव मागे पाठविला. डॉ. शर्मा यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी बदली झाल्याने त्यांनी पदभार सोडण्यापूर्वी पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावातील त्रुटींमध्ये सुधारणा केली. नवे वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे हेही आयुक्तालय सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयुक्तालयाचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव पोलिस महासंचालकांना सादर केला. या प्रस्तावामध्ये पोलिस आयुक्तालयासाठी नियोजित जागा म्हणून सध्याची पोलिस मुख्यालयाची नवीन इमारत देण्याचे नियोजन केले आहे. पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र कोल्हापूर व इचलकरंजी शहर असे निश्चित करण्यात आले आहे. गृहविभागाकडून कोल्हापुरात दि. १ जानेवारी २०१७ पासून आयुक्तालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा प्रस्ताव पोलिस महासंचालक दीक्षित यांच्यासमोर आहे.