शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या संपर्कासाठी पोलीसांची सायकल गस्त : संजय मोहीते

By admin | Updated: June 12, 2017 13:25 IST

दसरा चौकातून हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १२ : शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच नागरिकांचा संपर्क वाढावा, हा उद्देश समोर ठेवून पोलीसांची सायकल गस्त हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. मुंबई पाठोपाठ कोल्हापूरात पोलीस सायकलवरून दिवस-रात्र शहरात गस्त घालतील. या नवीन गस्तीचा प्रारंभ पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून होत आहे.

चाळीस वर्षांपूर्वी पोलीस सायकलवरून गस्त घालीत होते. त्यानंतर सायकलची जागा दुचाकीने घेतली. सध्या पोलीस दलात दुचाकी व चारचाकीमधून पोलीस दिवसा-रात्री गस्त घालत असतात. अशा वेळी एखाद्या कॉलनीत चोरटा शिरला असेल तर वाहनाच्या आवाजाने तो लपून बसतो. ते निघून गेल्यानंतर चोरी करून तो पसार होतो. अशा वेळी आवाज न होता पोलीस शहरात, उपनगरांत सर्वत्र फिरू लागले तर त्यांना चोरटे दिसून येतील आणि होणाऱ्या घरफोड्या वाचतील, हा उद्देश समोर ठेवून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरात पोलिसांना सायकलवरून गस्त घालण्यास सक्ती करा, असे आदेश पोलीस अधीक्षक मोहिते यांना दिले. त्यानुसार त्यांनी ३५ सायकली खरेदी केल्या आहेत. शहरात राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर अशी पाच पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यास पाच सायकली देण्यात आल्या आहेत. या सायकलीवर पुढे ‘कोल्हापूर पोलीस’ नावाची पाटी आहे. त्यानंतर प्रत्येक सायकलीवर ज्या-त्या पोलीस ठाण्याचे नाव आहे.

दिवसा व रात्री ठराविक वेळेत हे पोलीस शहरात गस्त घालणार आहेत. प्रत्येक पोलिसाला क्रमवार पद्धतीने ही गस्त सायकलवरून घालावी लागणार आहे. प्रदूषणमुक्त, इंधन बचत, आरोग्यास लाभदायक असा या सायकल गस्तीचा फायदा पोलिसांना होणार आहे. मुंबई पोलीसांनी असा उपक्रम सुरु केला आहे. कोल्हापूरातही सकाळी दोन तास व रात्री दोन तास सायकलीने गस्त घालण्यात येत आहे. या उपक्रमाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे, महिनाभरानंतर या उपक्रमाचा फायदा लक्षात येईल. ग्रामीण भागात या उपक्रमाचा चांगलाच फायदा होणार आहे. - विश्वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र