कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला ४४ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्याबाबत राज्य सरकार, पोलीस जनतेच्या भावनांशी खेळत आहे. मारेकऱ्यांबाबत नेमकी दिशा अजूनही त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे आता मारेकऱ्यांना अटक करणे सरकार, पोलिसांच्या कुवतीच्या बाहेर असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.ते म्हणाले, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना, हल्ल्यातील गुन्हेगारांबाबत नेमकी दिशा अजूनही पोलीस, राज्य सरकारला मिळालेली नाही. ते पाहता संबंधित मारेकऱ्यांना अटक करणे पोलीस, सरकारच्या कुवतीबाहेर असल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत. यापूर्वीदेखील नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना पकडण्याच्या जवळपास असल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात त्यादृष्टीने काहीच झाले नाही. आता पानसरे यांच्या मारेकऱ्यांबाबतदेखील काहीशी अशीच स्थिती असल्याचे दिसून येते. घरगुती वादातून हत्या झाली असल्याचे समजून तपास केल्यास पोलिसांच्या हातात काहीच लागणार नाही. (प्रतिनिधी)
पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करणे पोलिसांच्या कुवतीबाहेर
By admin | Updated: April 1, 2015 00:04 IST