शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पूलप्रश्नी पंतप्रधानांचा हस्तक्षेप

By admin | Updated: March 26, 2017 00:30 IST

संबंधितांना आदेश : प्रश्न मार्गी लावण्याचे संभाजीराजेंना आश्वासन

शिवाजी पूलप्रश्नी पंतप्रधानांचा हस्तक्षेप संबंधितांना आदेश : प्रश्न मार्गी लावण्याचे संभाजीराजेंना आश्वासनकोल्हापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी शिवाजी पुलासंदर्भात कायदा व न्याय मंत्रालयाकडे कायद्यामध्ये दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला होता; मात्र, कायदा व न्याय मंत्रालयाकडून कायद्यात कोणत्याही प्रकारचे बदल करता येत नसल्याचे दोन्ही मंत्र्यांना कळविले आहे. त्यामुळे पूलप्रश्नी पेच निर्माण झाल्याबद्दल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट संसदेतील कार्यालयात घेऊन पुलाची परिस्थिती समोर ठेवली. पंतप्रधान मोदी यांनी, खासगी सचिव राजीव टोपनो यांना बोलावून याप्रश्नी तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. हा प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सुमारे वीस मिनिटे या प्रश्नावर संभाजीराजेंनी चर्चा केली. यावेळी त्यांनी शिवाजी पुलाचे काम पुरातत्त्व विभागाने घातलेल्या निर्बंधांमुळे रेंगाळल्याचे सांगितले. १८७७ मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या जुन्या व धोकादायक बनलेल्या पुलावरूनच वाहतूक सुरू असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांना धक्काच बसला. शिवाजी पुलास १३५ वर्षे पूर्ण झाली असल्याने हा पूल मुदत कालबाह्य झाला आहे. शहराकडील बाजूस पुलापासून ४० मीटर अंतरावर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील ‘ब्रह्मपुरी टेकडी’ आहे. नियमानुसार पुरातन वास्तूपासून १०० मीटरच्या परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही. यासाठी ‘पुरातत्त्व’ची मंजुरी आवश्यक आहे, या तरतुदीकडे बोट दाखवून या पुलाच्या कामावर निर्बंध घातले. परिणामी, सत्तर टक्के काम पूर्ण झालेल्या नव्या पुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे महाडसारखी दुर्घटना होऊ नये, यासाठी तत्काळ मार्ग काढावा, असे संभाजीराजेंनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी खासगी सचिव राजीव टोपनो यांना बोलावून शिवाजी पूलप्रश्नी तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. शिवाजी पूल हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे, याप्रश्नी कायदा व न्याय मंत्रालयाकडून कायद्यात कोणतेही बदल होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे मोदी यांनी, विषय संवेदनशील असल्याने प्रसंगी कायद्यात बदल करा; पण शिवाजी पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. - संभाजीराजे छत्रपती, खासदारकोल्हापुरातील शिवाजी पूलप्रश्नी हस्तक्षेप करून तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.