शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

शाहूवाडीत खनिज संपत्तीची लूट

By admin | Updated: December 23, 2015 01:29 IST

शिवसेनेचा आरोप : ‘वारणा मिनरल्स’कडून बेकायदेशीर उत्खनन; वन, महसूल, खनिज अधिकाऱ्यांच्या संगनमताने दरोडा

कोल्हापूर : मे. वारणा मिनरल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (वारणानगर) कडून येळवण जुगाई (ता. शाहूवाडी) येथे बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन सुरू असून वन, महसूल, खनिकर्मचे अधिकारी हे संगनमत करून या खनिज उत्खनन दरोड्यात सहभागी झाले आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी वन, प्रदूषण नियंत्रण, जिल्हाधिकारी या कार्यालयांवर मोर्चा काढणार आहे. पहिल्या टप्प्यात उद्या, गुरुवारी येथील वनसंरक्षकांना घेराव घालणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.देवणे म्हणाले, वारणा मिनरल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला खनिज उत्खननास परवाना देण्यावर महसूल विभागाने दिलेल्या परवान्यास वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. तरीही महसूल विभागाने नियमांना बगल देत परंपोक (पडीक) म्हणून तुकडे पद्धतीने २६७.६७ हेक्टरवरील खनिज उत्खननास परवाना दिला. परवान्याचा मुद्दा उच्च न्यायालयात गेला. १७ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या न्यायालयातील सुनावणीत येळवण जुगाई येथील उत्खनन केलेल्या खनिज (बॉक्साईट) वाहतुकीस परवानगी दिली. दरम्यान, परवानगी देण्यात आलेली जमीन राखीव वन आहे, ही बाब कंपनीने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे न्यायालयाने तो परवाना दिला. अंतरिम खासगी अर्ज दाखल करून न्यायालयाने दिलेल्या परवान्याला स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती उपवनसंरक्षक ए. एम. आंजनकर यांनी दिली. ‘वारणा’कंपनीचे उत्खनन वन (संवर्धन) अधिनियमाच्या उल्लंघनास जबाबदार असल्याचेही जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे १९ नोव्हेंबर २०१५ रोजी आंजनकर यांनी कळविले आहे.एकत्रितपणे सर्व क्षेत्रांवर परवाना द्यावयाचा झाल्यास जनसुनावणी घेणे बंधनकारक आहे. जनसुनावणीत विरोध होणार हे गृहीत धरून हा परवाना ४.५ हेक्टरकरिता देण्यात आला आहे. प्रतिवर्षी परवाना क्षेत्रातील सहा लाख मेट्रिक टन खनिजाचे उत्खनन होणार आहे. कंपनी पाच ते सहा वर्षांत ३० लाख मेट्रिक टन खनिज उत्खनन करणार आहे, असे खोटे दाखविले आहे. महसूल विभागाने आर्थिक हितसंबंध जोपासत तुकडे करून उत्खननास परवाना दिलेला आहे. यावर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे; पण महसूल विभागाने वनाधिकाऱ्यांना दाद न देता कंपनीला ‘आशीर्वाद’ दिले आहेत.गेल्या वर्षीपासून जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या समितीने उत्खननाची पाहणी केलेली नाही. बेकायदेशीर, नियमबाह्य सुरू असलेल्या खनिज उत्खननाकडे लक्ष वेधूनही जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक हे दुर्लक्ष करून भ्रष्ट कारभाराला पाठिंबा देत आहेत. परवाना रद्द केल्यानंतर महसूल विभागाने करार रद्द केलेले नाहीत, हे गंभीर आहे. कंपनीने उत्खनन करताना एकाही अटीचे पालन केलेले नाही. त्यामुळे कंपनीचा परवाना रद्द करावा, या मागणीसाठी उद्या, गुरुवारी वनाधिकारी यांना घेराव, सोमवारी (दि.२८) प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर निदर्शने, शनिवारी (२ जानेवारी) जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना घेराव घालणार आहेत. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार उपस्थित होते.उच्च न्यायालयात स्थगितीउच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीत वारणा कंपनीला दिलेल्या उत्खननाच्या परवान्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. आता ८ जानेवारीला उत्खननाने झालेल्या जमिनीच्या नुकसानीसंबंधी महसूल आणि वन विभागाचे अधिकारी अहवाल देणार आहेत.सन २०१९ पर्यंत परवानासर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनक्षेत्रात अवैध उत्खननास बंदी आहे, असे असतानाही ४ जुलै २०१४ रोजी तत्कालीन प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी एस. एस. डोके यांनी ३१ मे २०१९ पर्यंत ‘वारणा कंपनी’ला उत्खननास परवाना दिलेला आहे. हा परवाना देताना पूर्वी उत्खननास बंदी घातलेल्या कोणत्याही कारणांचा विचार केलेला नाही. कोट्यवधी रुपयांची ‘मलई’ घेऊन अधिकाऱ्यांनी वारणा कंपनीवर मेहरबानी केल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोपही देवणे यांनी केला. करार नियमबाह्यवनजमिनीचे हक्क वंशपरंपरागत वारसदारांनाच देता येतील. इतर संस्थांना व व्यक्तींना देता येणार नाहीत. त्यामुळे वनजमीन ‘वारणा’ कंपनीस खाणकामाकरिता करारावर देण्याची कार्यवाही नियमबाह्य आहे, असे उत्तर प्रधान मुख्य वनसंरक्षक (नागपूर) यांनी ‘वारणा’ कंपनीस उत्खननासाठी मागितलेल्या परवाना अर्जास दिले आहे. तरीही कंपनीने हा परवाना मिळविला आहे. केवळ ३० हजार रुपयांतखनिकर्म विभागाचे प्राधिकृत अधिकारी यांनी १४ आॅगस्ट २००३ रोजी ३० हजार रुपये भरून घेऊन शाहूवाडी येथील दुय्यम निबंधकांनी खनिकर्म विभागातर्फे श्री वारणा मिनरल्स या संस्थेस गट क्रमांक ६२ मधील २६७.६७ हेक्टर जमीन हस्तांतरित करून दिली. त्यानंतर सातबारावर इतर हक्कांत ही संस्था आणि भागीदारांची नावे लागली. प्रस्तावित जागा ही वनक्षेत्र असल्याचे संस्थेस निदर्शनास आणून दिले. त्यावेळी संस्थेने १९९१ ते २००४ पर्यंतचा सातबारा उतारा काढून पडताळणी केली. त्यावरून परंपोक सरकारी पडीक जमीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यात वनविभागाचे नाव कोठेही नाही, असा महसूल विभागाचा दावा आहे.