शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकचे हँडग्लोव्हज, सेल संपलेले ऑक्सिमीटर... कसे तपासायचे माझे कुटुंब?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:40 IST

घरी महिला केस रंगवताना वापरतात तसला हलक्या दर्जाचा प्लास्टिकचा हॅन्डग्लोव्ह, बॅटरी सेल संपलेले ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनर घेऊन ह्यआशाह्ण कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबांची तपासणी करीत आहेत. त्यातून कोरोना संशयित रुग्ण कसे हाताला लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकचे हँडग्लोव्हज, सेल संपलेले ऑक्सिमीटर... कसे तपासायचे माझे कुटुंब?आशा वर्कर्सना पडला प्रश्न

कोल्हापूर : घरी महिला केस रंगवताना वापरतात तसला हलक्या दर्जाचा प्लास्टिकचा हॅन्डग्लोव्ह, बॅटरी सेल संपलेले ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनर घेऊन ह्यआशाह्ण कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबांची तपासणी करीत आहेत. त्यातून कोरोना संशयित रुग्ण कसे हाताला लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्य सरकारने मंगळवारपासून ह्यमाझे कुटुंब... माझी जबाबदारीह्ण ही मोहीम सुरू केली आहे. त्याअगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. ही कामे सध्या फक्त आशा कर्मचारीच करीत आहेत; परंतु त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही पुरेशी दक्षता घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यांना शासनाने हँडग्लोव्हज दिलेले नव्हते. त्याबद्दल वारंवार तक्रारी झाल्यानंतर आता त्याचा पुरवठा केला आहे; परंतु ते ग्लोव्हज घालून तपासणी कशी करायची? असाच प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.

केस रंगवताना वापरण्यात येणारे व हवेने उडून जाणारे हे ग्लोव्हज आहेत. ते घातले तर वारंवार हातातून निसटून पडतात. वापरून फेकून द्यायचे असल्याने त्यांचा दर्जाही तसाच आहे. असे ग्लोव्हज घालून आम्ही कशी तपासणी करायची? असा प्रश्न आशा कर्मचारी विचारत आहेत.त्यांना तपासणीसाठी ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनर देण्यात आले आहेत; परंतु त्यांचे बॅटरी सेल संपलेले असतात. त्यामुळे त्या ते फक्त सोबत घेऊन जातात; पण प्रत्यक्षात त्याचा वापर करता येत नाही. परिणामी लोक सांगतील तीच माहिती भरून घेऊन ही तपासणी सुरु आहे. खरे तर ही तपासणी एकत्रित करायची आहे; परंतु अन्य विभागांचे कर्मचारी येत नसल्याने ती आशाच करीत आहेत.

आमच्या घरी मंगळवारी आशा कर्मचारी आल्या होत्या. त्यांच्याकडे ऑक्सिमीटर होते. परंतु त्यातील बॅटरी सेल संपलेला होता. त्यामुळे त्यांनी फक्त प्राथमिक माहिती विचारली. अशा पद्धतीने ही तपासणी मोहीम झाली तर त्यातून खरी माहिती बाहेर येणार नाही व रुग्णसंख्या वाढू शकते.मारुती संकपाळ, ज्येष्ठ नागरिक, मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर