शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीचा झटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:28 IST

कोल्हापूर : प्लास्टिकबंदीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी महानगरपालिकेने धडक कारवाई करत शहरातील सहा व्यापारी व दुकानदारांकडून ३० हजारांचा दंड वसूल केला. त्यांच्याकडून सुमारे ३० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या, तर महापालिकेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी १३ आरोग्य कार्यालयांमध्ये दिवसभरात ४५० किलो प्लास्टिक जमा केले.महापालिकेने शनिवारी धडक कारवाई सुरू करूनही ...

कोल्हापूर : प्लास्टिकबंदीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी महानगरपालिकेने धडक कारवाई करत शहरातील सहा व्यापारी व दुकानदारांकडून ३० हजारांचा दंड वसूल केला. त्यांच्याकडून सुमारे ३० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या, तर महापालिकेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी १३ आरोग्य कार्यालयांमध्ये दिवसभरात ४५० किलो प्लास्टिक जमा केले.महापालिकेने शनिवारी धडक कारवाई सुरू करूनही व्यापारी व दुकानदारांवर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. रविवारच्या कारवाईतही व्यापाºयांकडून प्लास्टिक जप्त करण्यात येऊन दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात मंगळवार पेठेतील हंसराज स्वीट मार्ट, बिंदू चौकातील माधुरी बेकरी, उमा टॉकीज चौकातील गजानन बेकरी, राजारामपुरीतील जॅक अ‍ॅँड जिल शॉपी, शिवाजी चौकातील अंबिका स्वीट मार्ट, सलीम फरसाण मार्ट यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला तसेच सुमारे ३० किलो प्लास्टिकच्या पिशव्याही जप्त करण्यात आल्या.एका बाजूला व्यापारी प्लास्टिक बंदीला सहकार्य करत नसले तरी नागरिकांनी यासाठी उत्स्फूर्तपणे सहकार्य दिले आहे. दिवसभरात शहरातील महापालिकेच्या १३ आरोग्य कार्यालयांमध्ये नागरिकांनी जवळपास ४५० किलो प्लास्टिकचे साहित्य आणून जमा केले. महापालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांकडून प्लास्टिक जमा करण्यास मिळालेला प्रतिसाद पाहता महापालिकेकडून शहरात प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी आज, सोमवारी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.इचलकरंजीत अडीच लाखांचे प्लास्टिक जप्तप्लास्टिक बंदीअंतर्गत रविवारी येथील नगरपालिकेच्या पथकाने पाच व्यापारी दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपयांच्या प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू जप्त केल्या. तसेच २५ हजार रुपये दंड वसूल केला. नगरपालिकेने अचानकपणे केलेल्या कारवाईमुळे दुकानदारांची धावपळ उडाली.सरकारने शनिवार (दि.२३) पासून प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी इचलकरंजी नगरपालिकेने शनिवारी कारवाई केली नव्हती. रविवारी सुटीचा दिवस असूनही अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे व मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३० कर्मचाºयांच्या पथकाने अचानक कारवाई सुरू केली आणि ही वार्ता शहरात वाºयासारखी पसरल्यामुळे प्लास्टिक असलेल्या व्यापारी, दुकानदार, बेकरी अशा ठिकाणी खळबळ उडाली.पथकाने सुरुवातीला जवाहर प्लास्टिक, त्यानंतर साळुंखे किराणा स्टोअर्स, काश्मीर बेकरी व कांबळे यांच्या दुकानात अचानक धाड टाकली. तेथे सुमारे २०० किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या, ग्लास, थर्माकोलचे प्लेट असे साहित्य ताब्यात घेतले. या चौघांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे वीस हजार रुपये दंड वसूल केला.त्यानंतर पथकाने अचानकपणे कागवाडे मळा येथे असलेल्या सालासार ट्रेडिंग कंपनी या होलसेल व किरकोळ प्लास्टिक थर्माकोल वस्तू विक्रीच्या दुकानावर धाड टाकली. या दुकानात असलेल्या प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंचा माल गायब झाला होता. मात्र, काही वेळाने दुकानापासून सुमारे ५०० फुटांवर असलेल्या गोदामावर कारवाई करण्यात आली. गोदामामध्ये प्लास्टिक पिशव्या, ग्लास, थर्माकोलच्या प्लेटस्, स्ट्रॉ, चमचे असे साहित्य आढळून आले. या साहित्याने नगरपालिकेकडील एक ट्रक अक्षरश: भरला गेला. ७०० किलो वजनाचे हे साहित्य असल्याची माहिती देण्यात आली. साहित्य जप्त करून त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.