शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तुती लागवड, कीटक संगोपन साहित्य पुरवठा योजना

By admin | Updated: November 24, 2014 23:58 IST

रेशीम उद्योगाला चालना : उद्योगवाढीसाठी अनुदानात वाढ

एम. ए. पठाण - कोल्हापूर -रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी शासनाने तुती लागवड व कीटक संगोपन साहित्य पुरवठा योजना नव्याने सुरू केल्या आहेत. काही योजनांचे उद्योगास अनुकूल अशा सुधारणा करून त्यामध्ये मिळणाऱ्या अनुदानात वाढ केली आहे. याद्वारे पूर्वीपेक्षा अधिक लाभ रेशीम शेतकऱ्यांना देण्यासाठी रेशीम संचालनालयाने पावले उचलली आहेत.रेशीम उद्योगास आवश्यक तुती रोपे, बियाणे यांचा पुरवठा जिल्हा रेशीम कार्यालय करते. तुती लागवड योजनेंतर्गत नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी एका गुंठ्यात तुतीची ५५०० रोपे तयार केल्यास शासनाकडून १०,५०० रुपये अनुदान मिळेल. तुती रोपवाटिका योजनेंतर्गत एक एकर किंवा अर्धा एकर तुती रोपे तयार केल्यास संबंधिताकडून एक रुपयांप्रमाणे रोपे खरेदी करुन त्याला शासनाकडून प्रतिरोप ६५ पैशांप्रमाणे अनुदान मिळणार आहे.ठिबक सिंचन संच पुरवठा योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ केली आहे. तुती लागवड करुन ठिबक सिंचनाचा संच बसविल्यास एकरी किंमत रक्कम ३०,००० पैकी ७५ टक्के रक्कम म्हणजेच २२,५०० रुपये अनुदान केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत मिळणार आहे.कीटक संगोपन साहित्य पुरवठा योजना नव्याने सुरू केली आहे. यामध्ये तुती लागवड केल्यानंतर आधुनिक पद्धतीने तुती जोपासना करणे, कीटक संगोपन करणे यासाठी केंद्रीय पुरस्कृत योजनेंतर्गत एकरी रुपये ७०,००० रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेता येईल. कीटक संगोपनगृहात रॅकची उभारणी केल्यास त्यापैकी ५० टक्के अनुदान मिळू शकते. अशाप्रकारे रेशीम संचालनालयाने काही नव्या योजना व जुन्या आवश्यक योजनाचे अनुदान वाढवून शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग अधिक लाभदायी बनविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेशीम उद्योगास चालना मिळून रेशीम व्यावसायिकांना आर्थिक सुबत्ता मिळेल.रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी तुती लागवड योजना, कीटक संगोपन साहित्य पुरवठा योजना नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच जुन्या योजनांच्या अनुदानातही वाढ करण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- एम. के. मुल्लारेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूरकिटक संगोपन बांधकाम योजनेंतर्गत एक हजार स्क्वेअर फूट बांधकामास ८२,५०० रुपये अनुदान, तर ८०० स्क्वेअर फूट बांधकामास ८७,५०० रुपये, ६०० स्क्वे. फुटास ६३०० रुपये, तर ३०० स्क्वे. फूट बांधकामास २१,००० रुपये अनुदान मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तुती लागवड केल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एकरी २०,००० रुपये अनुदान लाभ मिळू शकते.