शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांची वनस्पती रंगांची उधळण

By admin | Updated: March 16, 2017 00:55 IST

निसर्गमित्र, नाईस प्ले ग्रुपचे आयोजन : रासायनिक रंग टाळून रंगपंचमी

कोल्हापूर : कोणी बनले वाघ, कोणी हत्ती, तर काही फुलपांखरु बनले. वनस्पती रंगांची उधळण करीत चिमुकल्यांनी आणि त्यांच्या पालकांनी बुधवारी मंगळवार पेठेतील बेलबाग येथे रंगपंचमी साजरी केली. निमित्त होते, निसर्गमित्र व नाईस प्ले गु्रपद्वारे घेतलेल्या रंगपंचमी स्पर्धेचे. रासायनिक रंग किती घातक आहेत, पाण्याचा अपव्यय टाळा, झाडे जगवा असा संदेश देत वनस्पती रंगांची ही उधळण झाली.रंगपंचमीमध्ये धम्माल करा, पण रासायनिक रंगांमुळे होणारे घातक परिणाम समोर ठेवून वनस्पती रंगांचा वापर करा, असा संदेश देत रंगपंचमी जल्लोषात साजरी झाली. वनस्पतिजन्य पदार्थांपासून तयार केलेल्या रंगांनी ‘चेहरा व शरीर रंगवा’ या स्पर्धेत चिमुकले रंगून गेले. पालकांनी घरी बनविलेल्या नैसर्गिक रंगाने चिमुकल्यांनी चेहरा रंगवत ‘पर्यावरण वाचवा’चा संदेश दिला.काहीजण चेहऱ्यावर, अंगावर रंग रेखाटत वाघ बनले; काहीजण हत्ती बनले, तर काहींनी फुलपाखरांची रंगसंगती चेहऱ्यावर रेखाटून आनंद व्यक्त केला. अनेकांनी पाणी वाचवा, झाडे जगवा, झाडे लावा, कॅशलेस अशी अनेक घोषवाक्ये रंगातून अंगावर रेखाटली होती. प्रत्येकाला मिळालेल्या तासाच्या मर्यादित वेळेत पालकांनी मुलांच्या अंगावर रंग रेखाटले. त्यात काही पालकांनीही रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटला. दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सलग नवव्या वर्षी झालेल्या या उपक्रमावेळी ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले यांनी पर्यावरणपूरक सणांची गरज व नैसर्गिक रंगांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन प्रेमा श्रीखंडे, वनिता चव्हाण, प्रवरा पित्रे, राणिता चौगुले, अभय कोटनीस, पराग केमकर यांनी केले होते. (प्रतिनिधी)रंगांची निर्मितीनैसर्गिक रंगांची निर्मिती ही स्पर्धकांनी घरीच केली होती. पालकांनी घरी उरलेल्या शिळ्या भाज्या, पाने व निर्माल्यापासून विविध रंग तयार करण्यात आले होते. त्यामुळे घरी स्वत: बनविलेले नैसर्गिक रंग व बाहेरून घेतलेले नैसर्गिक रंग अशा दोन गटात स्पर्धा घेतली.स्पर्धेत विजेतेस्पर्धेत पहिल्या गटात अनुक्रमे : प्रणित उदय साळोखे, कुशल अमोल जगदाळे, सिया संदीप खोत; तर दुसऱ्या खुल्या गटात : अगत्या अविनाश शिंदे, अजय पद्माकर राऊत, वरीश विक्रम चव्हाण. उत्तेजनार्थ सक्षम रमेश लोखंडे, भार्गवी मोहन कारेकर व सर्वेशा अनिल बडीगेर.‘रासायनिक रंग टाळा व नैसर्गिक रंगांची रंगपंचमी खेळा’ असा संदेश देत निसर्गमित्र आणि नाईस प्ले गु्रपच्या वतीने बुधवारी मंगळवार पेठेतील बेलबाग येथे घेतलेल्या स्पर्धेत चिमुकली अशी रंगून सहभागी झाली होती.