शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

साखर उत्पादन कमी करण्याचे नियोजन

By admin | Updated: September 20, 2014 00:29 IST

साखर उत्पादन कमी करण्याचे नियोजन

विश्वास पाटील-कोल्हापूर -गतवर्षीचा साखरेचा साठा शिल्लक आहे व यंदाही सुमारे गरजेपेक्षा वीस लाख टनांहून जास्त साखर उत्पादन देशात होणार असल्याने कारखान्यांचे साखर उत्पादन कमी कसे करता येईल, यासंबंधीचे नियोजन करण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी मुंबईत साखर संघाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यासंबंधीचा तांत्रिक प्रस्ताव आठवड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट(व्हीएसआय)ने तयार करावा व तो राज्य साखर संघामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झाला. हा प्रस्ताव राज्याकडून केंद्राकडे गेल्यावर आपण त्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन पवार यांनी दिले.देशात गेल्या हंगामातील सुमारे ८० लाख टन साखर शिल्लक आहे. यंदाही देशभर चांगला पाऊस झाल्यामुळे किमान २५० लाख टन साखर उपलब्ध होईल, असा प्राथमिक अंदाज इंडियन शुगर मिल असोसिएशनने(इस्मा)ने दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केला आहे. देशाची साखरेची वार्षिक गरज २३० लाख टन आहे. त्यामुळे यंदाही त्याहून जास्त २० लाख टन साखर बाजारात आल्यास साखरेचे दर आणखी कोसळणार आहेत. आताच हे दर २८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हंगाम सुरू होताच ते अडीच हजारांवर येतील, अशी भीती कारखानदारीतून व्यक्त होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून काय करायचे, याचा विचार करण्यासाठी मुख्यत: ही बैठक झाली. त्यास पवार यांच्यासह सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, अखिल भारतीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, व्यवस्थापकीय संचालक मनोहर जोशी, ‘व्हीएसआय’चे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव देशमुख, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर, आदी उपस्थित होते. या बैठकीत ‘व्हीएसआय’च्या तज्ज्ञांनी प्रारंभी काही माहिती दिली.साखरेऐवजी दोन-तीन पर्यायउत्पादन कमी करायचे झाल्यास दोन-तीन पर्याय पुढे आले. साखरेऐवजी इथेनॉल करण्यास प्राधान्य दिले जावे. साखर तयार होण्याच्या अंतिम प्रक्रियेत जो सिरप होतो, तसा सिरप तयार करता येऊ शकेल का, अशी चर्चा झाली. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदीनुसार साखर निर्यातीला आता अनुदान देता येत नाही आणि अनुदान मिळणार नसेल, तर साखर निर्यात करण्यास परवडत नाही. त्यामुळे इथेनॉलसाठीच केंद्राकडे लिटरला दहा रुपयांचे अनुदान मागण्यात यावे, अशी चर्चा झाली. त्यासंबंधीचा तांत्रिक प्रस्ताव ‘व्हीएसआय’ने आठ दिवसांत तयार करून साखर संघामार्फत राज्य शासनाला द्यावा, अशा सूचना पवार यांनी बैठकीत केल्या.