शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पेमेंट वसुलीबाबत नियोजन करणार

By admin | Updated: April 20, 2017 23:59 IST

इचलकरंजीतील कापड दिवाळेप्रकरण : आज यंत्रमागधारकांची बैठक

इचलकरंजी : पॉपलीन कापडाच्या खरेदी-विक्रीमध्ये अघोषित दिवाळे निघालेल्या जी. तलेसरा या व्यापारी फर्मकडे इचलकरंजीतील यंत्रमागधारकांची सुमारे ५० कोटी रुपये व विटा येथील यंत्रमागधारकांची सुमारे पाच कोटी रुपये रक्कम थकीत असल्याचे उघडकीस येत आहे. शहरातील आतापर्यंतच्या सर्वाधिक दिवाळेप्रकरणी पेमेंट वसुलीचे नियोजन व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अडत व्यापारी, दलाल व यंत्रमागधारकांची इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या आवारात व्यापक बैठक घेण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला.पॉपलीन कापड खरेदी करून राजस्थानमधील बालोत्रा येथे पाठविणाऱ्या जी. तलेसरा या व्यापारी फर्मकडून पेमेंट अनियमित होत असल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली होती. याबाबत गेले दोन दिवस शहर व परिसरामध्ये उलटसुलट चर्चा होती. शहरातील सर्वांत मोठे दिवाळे निघण्याच्या या घटनेमुळे पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष सचिन हुक्किरे, नगरसेवक सागर चाळके, संजय तेलनाडे, जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, आदींनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे येथील गावभाग पोलिस ठाण्यामध्ये तलेसरा यांच्याविरोधात कापड घेऊन त्याचे पेमेंट केले नसल्याबद्दलची तक्रार बुधवारी दाखल झाली.अशा पार्श्वभूमीवर गुरुवारी हत्ती चौकात पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष हुक्किरे, नगरसेवक चाळके, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, दीपक राशिनकर, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, श्रीशैल कित्तुरे, सूरज दुबे, दत्ता टेके, आदींची बैठक झाली. या बैठकीत या प्रकरणात गुंतलेल्या यंत्रमागधारक व त्यांच्या रकमेचा अंदाज घेण्यात आला. तलेसरा यांच्या कापड खरेदी-विक्री व्यवहारात इचलकरंजीतील ११० कारखानदार व विटा येथील १७ कारखानदार गुंतले असून, या सर्वांची रक्कम सुमारे ५५ कोटी रुपये असल्याची माहिती हुक्किरे यांनी सांगितली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत अडत व्यापारी, कापड दलाल व संबंधित कारखानदार यांच्या स्वतंत्रपणे बैठका आज, शुक्रवारी घेण्याचे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)बालोत्रा-राजस्थानला पथक रवानापॉपलीन कापड खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबाबत बालोत्रा येथे जाऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी कारखानदारांचे एक पथक बुधवारी रात्री उशिरा रवाना झाले. या पथकामध्ये तुकाराम साळुंखे, अनिल कांबळे, जयकुमार यळरुटे, फिरोज जमखाने, सुनील रसाळ, आप्पासाहेब मगदूम, आदींचा समावेश आहे. या पथकाकडून बालोत्रा येथे जाऊन तेथे असलेल्या जी. तलेसरा यांच्या मुख्य कार्यालयास भेट देणे व कापड खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील रक्कम परत मिळविण्याबाबत तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेच्यावतीने देण्यात आली.