शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी २५० लसीकरण केंद्रांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी १५० केंद्रे कार्यरत असून, आणखी २५० केंद्रे वाढवण्यात येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी १५० केंद्रे कार्यरत असून, आणखी २५० केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस उपलब्ध करून देण्यासाठी ही पूर्वतयारी असून, याबाबत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सध्या ६ लाख ३७ हजार २२७ इतके ४५ वर्षांवरील, तर ५ लाख ९ हजर ८१९ इतके ६० वर्षांवरील असे एकूण ११ लाख ४७ हजार ०४६ लाभार्थी लसीकरणासाठी अपेक्षित आहेत. यापैकी २ लाख ५० हजार लाभार्थ्यांचे २५ मार्चअखेर लसीकरण झाले आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील आकडेवारीचा समावेश नाही. उर्वरित ९ लाख नागरिकांना पुढील २० दिवसांत लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरणाची सोय उपलब्ध करून देणे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी प्राधान्याने मोठ्या गावांच्या ठिकाणी असणाऱ्या तसेच नेटसाठी चांगली रेंज ज्या ठिकाणी आहे, अशा उपकेंद्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे. एकाच दिवशी सर्वत्र लसीकरणाची वाढीव केंद्रे सुरू करण्यापेक्षा टप्प्या-टप्प्याने ती सुरू करण्यासाठी नियोजन सुरू आहे.

जिल्हा परिषदेकडील उपकेंद्रांवरील व्यवस्था जिल्हा आरोग्य अधिकारी डा. योगेश साळे, लसीकरण मोहीम समन्वय डा. फारूक देसाई, तर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांच्याअंतर्गतचे नियोजन जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

चौकट

मुबलक लस पुरवठा आवश्यक

कोल्हापूर जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे काम नियोजनबध्दरित्या सुरू आहे. अजूनही लस नाही म्हणून कोणालाही परत पाठवण्यात आलेले नाही. परंतु आता १ एप्रिलनंतर एकदम मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यावेळी खऱ्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. तसेच यापुढच्या काळात लसीचा पुरेसा पुरवठा आणि तो ही वेळेत होणे आवश्यक आहे.

आता मनुष्यबळ कुठले आणायचे

एकीकडे गेल्यावर्षी संकट काळात ज्यांनी सेवा दिली, त्यांचे मानधन अजून मिळालेले नाही. आता पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जर पुन्हा अशी सेवा घेण्याची गरज पडली, तर ही मंडळी कामासाठी कशी तयार होणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे तातडीने या सर्वांचे मानधन देण्याची गरज आहे.