शहरं
Join us  
Trending Stories
1
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
2
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
3
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
4
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
5
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
6
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
7
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
8
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
9
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
10
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
11
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
12
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
13
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
14
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
15
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
16
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
17
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
18
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
19
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
20
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."

बिबट्याला मारून नखे लांबविली

By admin | Updated: August 19, 2014 00:38 IST

पेंडखळे येथील घटना; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

राजापूर : सुमारे पाच वर्षीय बिबट्याची हत्या करून त्याची नखे चोरल्याची घटना तालुक्यातील पेंडखळे सतीचे रान परिसरात घडली असून, त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. राजापूर तालुक्यात प्रथमच अशी घटना घडली असून, राजापूर वनविभागाने अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.साधारणत: आठ-दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली असून, यामध्ये मृत झालेला बिबट्या मादी आहे. ती पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होती. पेंडखळे गावात जंगलमय परिसर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये सतीचे रान म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत बिबट्या मृतावस्थेत आढळला. ग्रामस्थांनी राजापूर वनविभागाला माहिती देताच राजापूरचे वनअधिकारी गुरव घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. तोवर रत्नागिरी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अशोक लाड हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तेथे पोहोचले.मृतावस्थेत आढळलेली पाच वर्षीय मादी बिबट्या विद्रुप झाली होती. चारही पाय तोडून नखे गायब झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले. संपूर्ण शरीर कुजल्यामुळे तिचे विच्छेदन करताना अवयव तुटत होते. तशा स्थितीत डॉक्टर्सनी बिबट्याचे विच्छेदन पार पडले. हत्या केल्यानंतर बिबट्याचे चारही पाय तोडण्यात आले आणि शिकाऱ्याने नखे चोरून नेली.पाच वर्षांपूर्वी पेंडखळे भू परिसरात एक मोठा नर बिबट्या फासकीत अडकून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. वनविभागाने अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध वनजीवी संरक्षक अधिनियम १९७२ च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत राजापूर पोलीस ठाण्याला माहितीही देण्यात आली असून, बिबट्याची नखे चोरून नेणाऱ्या अज्ञात शिकारी व्यक्तीचा कसून शोध घेण्याचे काम सुरू आहे. विच्छेदनानंतर बिबट्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)मृत बिबट्याची सर्व नखे चोरण्यात आली आहेत. मात्र, बिबट्याच्या शरीरावर गोळी लागल्याच्या किंवा फासकीत अडकल्याच्या कसल्याही खुणा नव्हत्या. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल.- अशोक लाड, रत्नागिरी वनक्षेत्रपाल