शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

कार्यक्रमपत्रिकेत ‘सौ’ला स्थान

By admin | Updated: March 13, 2015 23:58 IST

जोतिबा परिवर्तन : लग्न, वास्तुशांती आमंत्रणासाठी महिलांची नावे

दत्तात्रय घडेल- जोतिबा लग्न, वास्तुशांती किंवा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, कार्यक्रम पत्रिकेवर पुरुषप्रधान छाप पाहायला मिळते. महिलांना फारसे स्थान मिळत नाही. लग्नपत्रिकेत महिलांचे नाव फक्त ‘सौ’ पुरतेच असते. संपूर्ण पुरुषांचे नाव लिहिण्याची परंपरा आजही पाहायला मिळते; पण याला अपवाद जोतिबा डोंगर येथील लग्नसोहळा व मौजीबंधन पत्रिकेतून दिसून आला. लग्नपत्रिकेवर संपूर्ण महिलांचे नाव लिहून पत्रिका वाटण्यात आल्या. प्रथम पत्नीचे नाव, नंतर पतीचे नाव लिहिण्यात आले. हा नवपरिवर्तनवादी विचार स्तुत्य बदल म्हणावा लागेल. जोतिबा डोंगर येथील सुनील शिंगे यांनी आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेमध्ये महिलांना पहिले स्थान देऊन पत्रिका वाटल्या. विनोद चिखलकर यांनी आपल्या मुलाच्या मौजीबंधन पत्रिकेवरही महिलांचे प्रथम नाव व नंतर पतीचे नाव लिहून महिला वर्गाला प्रतिष्ठा मिळवून दिली. शासनाने शाळेच्या दाखल्यावर, रेशनकार्डावर आईचे, पत्नीचे नाव प्रथम देण्याचा आदेश काढला आहे. आता लोकांमधूनच महिलांना सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे.शाहू वैदिक विद्यालयाने मंदिरामध्ये फटाके उडवू नये, या आवाहनालाही प्रतिसाद देऊन मंगलाष्टका झाल्यानंतर फटाके वाजविले नाहीत. या त्यांच्या कार्याचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.सुमारे ७० पालकांनी मुलांचे मौजीबंधन सामुदायिकरीत्या करून वेळ, पैसा, श्रम यांची बचत केली. गावातील उपाध्ये, गावकर, जोतिबा पुजारी, भक्तगण, चॅरिटेबल ट्रस्ट, ग्रामस्थ यांनी एकत्रित हा निर्णय घेतला. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा या आधुनिक काळाचा विचार करून साजऱ्या केल्या पाहिजेत, हा नवा संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहे. लग्न सोहळ्यातील अवाढव्य खर्चावर मर्यादालग्न सोहळ्यामध्येही आता होणाऱ्या अवाढव्य खर्चावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. लग्नाच्या वरातीमध्ये होणाऱ्या डॉल्बीवरील खर्चाला फाटा देत येथील सोमनाथ ढोली यांनी भावाच्या लग्नाच्या वरातीमध्ये भावगीत, भक्तिगीत कार्यक्रम सादर करून आदर्श निर्माण केला आहे.