शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

संकेश्वर ते दोडामार्ग हा रस्ता आजरा व गडहिंग्लजमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग ...

संकेश्वर ते दोडामार्ग हा रस्ता आजरा व गडहिंग्लजमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्तीसाठी कोणताही निधी खर्च करीत नाही. राष्ट्रीय महामार्गचे कार्यालय कोल्हापुरात आहे व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी व पाहणी करून निधी लावण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळच नाही.

आजरा शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर भादवण तिट्टा ते आंबोली हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. माती टाकून या रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी डांबरीकरणातून खड्डे बुजविणे गरजेचे आहे.

अतिवृष्टीचा हा प्रदेश असल्याने व गोव्यासह कोकणात जाणाऱ्या नागरिकांना जवळचा असणारा हा रस्ता सध्या खड्ड्यांमुळे नादुरुस्त झाला आहे. १२५ वर्षांची साक्ष देणाऱ्या व्हिक्टोरिया पुलावरही खड्डे पडल्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे तयार झाले आहे.

वाहनधारकांना रस्ता सापडत नाही. रस्त्यावर एक ते दोन फुटाचे खड्डे तयार झाले आहेत. मात्र अधिकारी रस्त्यावरील खड्ड्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत. यापूर्वी नागरिकांनी आजरा तहसीलदार यांना भेटून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत व खड्डे बुजविण्याबाबत लक्ष वेधले आहे. अधिकाऱ्यांनी गणपतीपूर्वी खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. मात्र गणपती झाला, दसरा आला तरीही रस्त्यावरील खड्डे आहे तसेच आहेत. नागरिकांच्या निवेदनालाही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

फोटो ओळी : आजरा-आंबोली-गडहिंग्लज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे.

क्रमांक : २४०९२०२१-गड-०९