शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

पिस्तूल बाळगून चोरी करणारी टोळी गजाआड

By admin | Updated: January 17, 2015 00:42 IST

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : बेकायदेशीर पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या व जबरी चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज, शुक्रवारी अटक केली. राहुल संभाजी समुद्रे (वय २४, रा. किणी शाळेच्या पाठीमागे किणी, ता. हातकणंगले), रोहित राजेंद्र कार्वेकर (२३, रा. गणपती मंदिरजवळ दानोळी), गोट्या ऊर्फ प्रवीण बबन कुरणे (२४ रा. सुभाष चौक, दानोळी) अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत राऊंड, एक एअरगन पिस्तूल व मोबाईल, आयफोन, दुचाकी असा सुमारे दोन लाख ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पुणे-बंगलोर महामार्गावर किणी रस्त्यावर पोलिसांनी दुपारी सापळा रचला. यावेळी संशयित राहुल समुद्रे हा तेथून जात असताना त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्या कब्जातील देशी बनावटीची मॅगझिन असलेली पिस्तूल, जिवंत राऊंड व नऊ एम. एम. पिस्तूलसारखी दिसणारी एअरगन अशी एक लाख २० हजार २०० रुपयांची बेकायदेशीर अग्निशस्त्रे आढळली. त्यानंतर वडगाव पोलीस ठाण्याकडे भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३(१) २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर सांगली फाटा येथे संशयित रोहित राजेंद्र कार्वेकर व गोट्या ऊर्फ प्रवीण कुरणे यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आयफोन, मोबाईल असा सुमारे ९२ हजार रुपयांचा व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादी सुजित जनार्दन पाटील हे मित्रासोबत विमानतळ परिसरात एच. पी. गोडावूनजवळ अभ्यास करत बसले असताना तसेच अमर महेश चावला हे रस्ता बाजूच्या थांबवून मोबाईलवर बोलत असताना संशयितांनी ही चोरी केल्याचे उघडकीस आले. त्याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिलकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव,उपनिरीक्षक रमेश ढाणे, हमीद शेख यांच्यासह अनिल ढवळे, लक्ष्मण धायगुडे, शिवाजी खोराटे, यशवंत उपराटे, संजय काशीद, राजू आडूळकर, रफिक आवळकर, जितेंद्र भोसले, विजय कोळी, सुनील इंगवले, रमेश डोईफोडे, प्रकाश संकपाळ, संग्राम पाटील, अमित सर्जे, अमर आडसुळे, संजय हुंबे, विशाल काळेकर आदींनी केली.