शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिरजादे बिनविरोध तर शेळके, छाया पोवार चिठ्ठीद्वारे विजयी

By admin | Updated: April 21, 2016 00:51 IST

सभापती निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा; ‘ताराराणी’ला एक जागा

कोल्हापूर : महानगरपालिका प्रभाग समिती सभापती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. बुधवारी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला दोन समित्यांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका समितीवर सभापती करता आले. ताराराणी आघाडीला एका समितीचे तेही चिठ्ठीद्वारे सभापतिपद मिळाले. शिवसेनेच्या नियाज खान यांनी भाजप-ताराराणी आघाडीतर्फे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांनी माघार घेतली. शिवसेनेच्या राहुल चव्हाण यांनी निवडणूक लढविली, परंतु त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. गांधी मैदान प्रभाग समिती सभापतिपदी प्रतीक्षा धीरज पाटील, शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभापती सभापतिपदी अफजल कुतुबुद्दीन पिरजादे, राजारामपुरी प्रभाग समिती सभापतिपदी छाया उमेश पोवार व ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापती राजसिंह भगवानराव शेळके यांची निवड झाली. जिल्हाधिकारी अमित सैनी हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. गांधी मैदान प्रभाग समितीसाठी प्रतीक्षा पाटील (काँग्रेस) यांना १३, तर संतोष गायकवाड (भाजप) यांना ६ मते मिळाली. शिवाजी मार्केट प्रभाग सभापतिपदासाठी अफजल पिरजादे (राष्ट्रवादी) व नियाज खान (शिवसेना) यांचे अर्ज दाखल होते, परंतु नियाज खान यांनी माघार घेतली. त्यामुळे पिरजादेंची बिनविरोध निवड झाली. बागल मार्केट प्रभाग सभापतिपदासाठी छाया पोवार (काँग्रेस) व राहुल चव्हाण (शिवसेना) यांच्यात निवडणूक झाली. शिवसेनेने भाजप-ताराराणी आघाडीला पाठिंबा दिला होता, तर पूजा नाईकनवरे (ताराराणी) व वहिदा सौदागर (राष्ट्रवादी) या गैरहजर होत्या. त्यामुळे दोघांना ९-९ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून निर्णय घेतला. त्यात छाया पोवार विजयी झाल्या. ताराराणी मार्केट प्रभाग सभापतिपदासाठी माधुरी लाड व राजसिंह शेळके (ताराराणी) यांच्यात लढत झाली. दोघांना समान १०-१० मते मिळाल्यामुळे चिठ्ठी टाकली, त्यात शेळके नशीबवान ठरले. पूजा नाईकनवरे यांची अनुपस्थिती पूजा नाईकनवरे या ताराराणी आघाडीच्या नगरसेविका आहेत. शिवसेनेच्या राहुल चव्हाण यांना भाजप- ताराराणी आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे त्या नाराज झाल्या. निवडणुकीत राहुल चव्हाण यांनी प्रकाश नाईकनवरे यांचा पराभव केला. त्याचा राग पूजा नाईकनवरे यांनी बुधवारी सभेस अनुपस्थित राहून काढला. राजकारणातून नाईकनवरे यांनी विरोध केल्याने राहुल चव्हाण यांचा प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.