शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

फुलेवाडीची पाणी टाकी असून अडचण नसून खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST

फुलेवाडी : फुलेवाडी रिंगरोडवरील गंगाई लॉन येथे वीस लाख लिटर पाणी क्षमता असणारी पाण्याच्या टाकीची अवस्था असून अडचण नसून ...

फुलेवाडी : फुलेवाडी रिंगरोडवरील गंगाई लॉन येथे वीस लाख लिटर पाणी क्षमता असणारी पाण्याच्या टाकीची अवस्था असून अडचण नसून खोळंबा, अशी झाली आहे. टाकीचे काम २००९-१० साली पूर्ण झाले; पण आजअखेर त्यामध्ये एकही थेंब पाणीसाठा केला नसल्याने ती टाकी धूळ खात आहे. सदरची टाकी वापरात घेतल्यास फुलेवाडी रिंगरोडवरील अनेक नगर, कॉलनींमध्ये कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या कायमची निकालात निघण्याची शक्यता आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्याची आवश्यकता आहे. सध्या फुलेवाडी रिंग रोडवरील सद्‌गुरु कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, शिवशक्तीनगर, मातंग वसाहत, जि. प. कॉलनी, शिंदे कॉलनी, शिवदत्त कॉलनी, गणेश पार्क, धनगरवाडा, बोंद्रे नगर, गजानन कॉलनी, माहेश्वरी कॉलनी, गडकरी कॉलनी येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. फुलेवाडीच्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा सुरू केल्यास या कॉलनी, नगरामध्ये सुरळीत पाणी मिळू शकते.

संपूर्ण शहराला सन २००२ पासून शिंगणापूर पाणी योजनांचे पाणी सुरू आहे. त्यावेळेची उपनगराची वाढत्या लोकसंख्येची परिस्थिती पाहून फुलेवाडी पाणी टाकी बांधण्यात आली. रोडवरील सर्व नगरे व कॉलन्यांना मुबलक पाणी मिळण्यासाठी संपूर्ण रिंगरोडवरती पाइपलाइन टाकण्यात आली आहे; पण टाकीमध्ये पाणीच साठवले नसल्याने उपनगराला आपटे नगर पंपिंगमधूनच पाणी पुरवठा होत आहे. शिंगणापूर पाणी योजनेवरील ताण वाढल्याने सदरच्या टाकीत साठाच केला गेला नसल्याचे सांगितले जाते; मात्र उपनगरातील वारंवार होणारा विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करायचा असेल तर या टाकीत पाणीसाठा करण्याची गरज आहे.

फोटो : ०८ फुलेवाडी पाणीटाकी

ओळ : फुलेवाडी रिंगरोड वरील बंद असलेली पाण्याची टाकी (छाया : सागर चरापले)