सतीश पाटील-- शिरोली --कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत फौंड्री क्लस्टरचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून तब्बल ४२ कोटी ६३ लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. शिरोली आणि गोकुळ शिरगाव येथील सँड प्लँटचे अंतिम टप्प्यातील काम बाकी असून येत्या दोन महिन्यांत ते पूर्ण होईल. उद्योगधंद्यांना अत्याधुनिक किमती मशिनरी तसेच औद्योगिक वसाहतीतील प्राथमिक सोयी-सुविधा यांच्या पूर्ततेसाठी २00६ साली येथील उद्योजकांनी सुमारे ४२ कोटी ६३ लाखांचा फौंड्री क्लस्टर प्रकल्प तयार केला. तो मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला आणि त्यासाठी फौंड्री क्लस्टर असोसिएशनने पाठपुरावा केला. खासदार राजू शेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही उद्योजकांची बाजू मांडली होती. सँड प्लँटमध्ये ज्या उद्योजकांनी नोंदणी केली आहे, त्यांचीच वेस्ट सँड घेतली जाणार आहे. सँड प्लँटसाठी १५ टक्के रक्कम भरायची होती. त्यापैकी अजून बरीच रक्कम जमा झालेली नाही. भविष्यातील प्रदूषणाचे भान ठेवून अजूनही ज्यांनी क्लस्टरमध्ये सहभाग घेतलेला नाही, अशांनी मेंबरशिप घ्यावी-सचिन पाटील, अध्यक्ष फौंड्री क्लस्टरया झाल्या सुविधाजयसिंगपूर येथील ल. का. अकिवाटे औद्योगिक वसाहतीत सहा कोटी ९0 लाख रुपयांतून डांबरी रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, कृष्णा नदीवरुन पाण्याची सोय, कार्यालय उभारणी करण्यात आली शिरोळ येथील शाहू को-आॅप. इंडस्ट्रियल इस्टेट या औद्योगिक वसाहतीत तीन कोटी ४0 लाख रुपयांतून अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, दुधगाव येथून पाईपलाईन केली आहे. या ठिकाणी क्लस्टरचे १00 टक्के काम पूर्ण झाले आहे.४कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये सुमारे ७0 लाख रुपयांचे अत्याधुनिक सभागृह व मल्टिपर्पज मिटिंग हॉल, लघु उद्योजकांसाठी कॅडकॅम सेंटर, फर्निचर, जनरेटर सेट उभारला आहे. शिरोली येथे १४ कोटी ८८ लाख आणि गोकुळ शिरगाव येथे १६ कोटी १२ लाख रुपयांचे सँड रिक्लेमेशन प्लँट उभारण्याचे काम ९९टक्के पूर्ण झाले आहे. या प्लँटसाठी चीन येथून मशिनरी आणल्या आहेत. फक्तफर्नेस असेंब्ली आणि डस्ट कलेक्टर यंत्रणा हे काम फक्त उरलेले आहे. या कामासाठी चीन, तैवान येथून संबंधित व्यक्ती २0 जूनपर्यंत येणार आहेत व ते काम पूर्ण करणार आहेत. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल.
फौंड्री क्लस्टर टप्प्यात!
By admin | Updated: June 4, 2016 00:36 IST