शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

तावडे हॉटेलप्रकरणी याचिका दाखल होणार

By admin | Updated: June 21, 2014 00:42 IST

‘कॉमन मॅन’ जनआंदोलन उभारणार : तावडे हॉटेल अतिक्रमणांवर ‘लोकमत’चा प्रकाशझोत

कोल्हापूर : महापालिकेच्या गांधीनगर परिसरातील स्वमालकीच्या जागेवर अतिक्रमणे झाली असून, दोन दिवसांच्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर न्यायालयीन कचाट्यात सापडलेल्या मोहिमेच्या कारवाईबाबत ‘लोकमत’ने या संपूर्ण प्रकरणातील अंतर्गत घडामोडींवर प्रकाशझोत टाकला. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा या प्रकरणाचा तड लावण्यासाठी वैयक्तिक जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अनिल कदम यांनी दिली आहे. तर ‘कॉमन मॅन’ संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तावडे हॉटेल अतिक्रमण कारवाई करताना न्यायालयात स्थगिती मिळू नये, यासाठी शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत कारवाईचा धडाका लावणे गरजेचे होते. मात्र, ऐन कामकाजादिवशीच कारवाई करत बचावाची संधी प्रशासनाने उपलब्ध करून दिली. बचाव करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी व कारभाऱ्यांची एक फळी राबत असल्याचे पुढे आले आहे. तावडे हॉटेलप्रकरणी संपूर्ण घडामोडींवर ‘लोकमत’ने ‘भूखंड लाटणारे बोके’ अशा मथळ्याखाली रोखठोख प्रकाश टाकला. याप्रकरणी अनेक सामाजिक संस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.