शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

माथाडीच्या नावाखाली उद्योजकांचा छळ--‘लोकमत’चे कौतुक

By admin | Updated: February 12, 2015 00:29 IST

सुभाष देसाई : कामगार व उद्योजकांचे हित साधून कृती आराखडा तयार करणार

कुपवाड : औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या माथाडी कामगार कायद्याचा दुरूपयोग सुरू आहे. या कायद्याच्या माध्यमातून काही धंदेवाईक प्रवृत्तीचे लोक उद्योजकांची छळवणूक करीत आहेत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्यामध्ये कामगारांच्या हिताला कोठेही धक्का लागणार नाही आणि उद्योजकांचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (बुधवारी) व्यक्त केले.कुपवाड एमआयडीसीमधील ९ कोटी ६० लाखांच्या रस्ते कामाचे उद्घाटन उद्योगमंत्री देसाई यांच्याहस्ते झाले. त्यानंतर सूरज ललित कला अकादमीमध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार संभाजी पवार, उद्योजक प्रवीण लुंकड, कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, सतीश मालू, उपाध्यक्ष डी. के. चौगुले उपस्थित होते.यावेळी देसाई म्हणाले की, राज्यामध्ये सध्या विजेचे संकट असून, उद्योगधंद्यांना महागड्या दराने वीज पुरविली जाते. वीज दरात कपातीसाठी उपाययोजनेचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात पाच लाख शेतकऱ्यांना सोलर पंप वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे विजेची बचत होऊन उद्योगांचा वीज दरही कमी होईल. उद्योजकांनी अशाप्रकारची चर्चासत्रे आयोजित केल्यामुळे उद्योगासंबंधी विचारमंथन घडून येते. त्यातून उद्योगांच्या अडीअडचणी समजतात. नवीन संकल्पनांची प्रचिती येते. उद्योगधंद्यांबाबतचा राज्यस्तरीय आराखडा तयार करताना, अशा चर्चासत्राचा उपयोग होतो, अशा शब्दात त्यांनी चर्चासत्राच्या आयोजनाचे कौतुक केले. आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले की, उद्योग खात्याने एमआयडीसी क्षेत्रात प्राथमिक सोयी-सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात. उद्योजक प्रवीण लुंकड म्हणाले की, फूड प्रोसेसिंगसाठी लागणारा कच्चा माल जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उपलब्ध होत आहे. शेतीला यातून चालना मिळेल. यावेळी शिवाजी पाटील, नगरसेवक गौतम पवार, सचिन पाटील, बापूसाहेब येसुगडे आदींची भाषणे झाली. यावेळी भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष रमेश आरवाडे, एन. जी. कामत, अण्णासाहेब कोरे, रवींद्र कोंडुसकर, चंद्रकांत पाटील, आयुब मकानदार, अनंत चिमड, सागर पाटील, रमाकांत मालू, बजरंग पाटील, पृथ्वीराज पवार, आनंदराव पवार, विकास सूर्यवंशी, पांडुरंग रूपनर, संजय बेडगे उपस्थित होते. (वार्ताहर)एसईझेड प्रस्तावात सुधारणा करण्याचे प्रयत्नएसईझेड (स्पेशल इकॉनॉमिक झोन) प्रस्तावात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एसईझेडचे जे प्रस्ताव उद्योग खात्याकडे सादर झाले आहेत, त्यांचे पुनर्विलोकन करण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रात सेक्टरवाईझ क्लस्टर डेव्हलपमेंट (सामुदायिक सुविधा) योजना राबविण्यावर भर देण्यात आहे. सांगली जिल्ह्यात फूड पार्कसाठी पूरक परिस्थिती आहे. त्यामध्ये शेती आणि खाद्यपदार्थ उद्योगांना सामावून घेता येईल, असे देसाई म्हणाले. ‘लोकमत’चे कौतुकउद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने बुधवारी ‘प्रश्नांच्या गर्दीत उद्योजकांची घुसमट’ या मथळ्याखाली जिल्ह्यातील उद्योजकांच्या प्रश्नांचा सर्वांगांनी ऊहापोह करणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. सकाळीच सांगलीत आलेल्या देसाई यांनी हे वृत्त वाचल्यानंतर ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ‘लोकमत’ने सांगली जिल्ह्यातील उद्योजकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अनेक नवे प्रश्न यामुळे लक्षात आले. प्रश्न सोडवण्यासाठी आमचे त्याच दिशेने प्रयत्न सुरू आहेत. शासनाने केलेल्या प्रयत्नांबद्दल एकीकडे प्रशंसा करतानाच परखड शब्दात उणिवाही मांडण्यात आल्या आहेत’, अशा शब्दात कौतुक करताना त्यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले. कुपवाड येथील चर्चासत्रामध्येही त्यांनी उद्योजक व राजकीय कार्यकर्त्यांसमोर ‘लोकमत’च्या वृत्ताचा वारंवार उल्लेख केला आणि अभिनंदन केले. शासन कारभारातील त्रुटी जाणवून द्याव्यात, सरकारवर टीका-टिप्पणी जरूर करावी, पण अभ्यास करून सामाजिक प्रश्नही मांडावेत, ही प्रसारमाध्यमांची मुख्य भूमिका ‘लोकमत’ने पार पाडली आहे, अशा शब्दात त्यांनी गौरव केला.