शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

स्थायीसह परिवहन सदस्य अज्ञातवासात

By admin | Updated: January 2, 2015 00:07 IST

निवडणूक अटळ : हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा; आजच्या सभेत होणार निवड

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी, परिवहन व महिला व बालकल्याण समिती सभापतींची निवड उद्या, शुक्रवारी विशेष सभेत होत आहे. महिला बालकल्याण सभापतिपदी कॉँग्रेसच्या लीला धुमाळ यांची निवड निश्चित आहे. मात्र, ‘स्थायी’साठी राष्ट्रवादीचे आदिल फरास व जनसुराज्य पक्षाच्या मृदुला पुरेकर, तर परिवहनसाठी कॉँग्रेसचे अजित पोवार व ‘जनसुराज्य’चे प्रकाश नाईकनवरे यांच्यात लढतीची चिन्हे आहेत. ‘व्हिप’ बजावूनही सदस्य फोडण्याच्या प्रक्रियेला वेग आल्यानेच आज, गुरुवारी सकाळी बैठक घेऊन आमदार हसन मुश्रीफ यांनी कॉँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य या पक्षांच्या सदस्यांना उद्या, शुक्रवारी सकाळी दहापर्यंत अज्ञातस्थळी जाण्याचा सल्ला दिला. याप्रमाणे सायंकाळी चार वाजता नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले. गेल्या चार वर्षांपासून एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य आघाडीत स्थायी व परिवहन समिती सभापतिपदावरून फूट पडली. स्थायी व परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांविरोधात अनुक्रमे मृदुला पुरेकर व प्रकाश नाईकनवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण हातात घेतले आहे. पुरेकर व नाईकनवरे यांच्या बंडाकडे सुरुवातीस सहजवृत्तीने पाहणारे नेतेही आता गंभीर झाले आहेत. कोणताही धोका नको, यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहावर आघाडीच्या नगरसेवकांनी बैठक घेतली. बंड थंड होते का याची चाचपणी केली. शेवटी प्रा. जयंत पाटील यांनी पुरेकर व नाईकनवरे हे निवडणूक लढविण्याबाबत ठाम असल्याचे स्पष्ट केल्यानंतर संबंधित सर्व सदस्यांना अज्ञातस्थळी जाण्याचा सल्ला मुश्रीफ यांनी दिला.त्यानुसार आज, गुरुवारी दुपारी चार वाजता आघाडीचे सर्व नगरसेवक व सदस्य सहलीसाठी रवाना झाले आहेत. उद्या सकाळी साडे दहावाजेपर्यंत हे सर्व सदस्य सहलीवरून थेट महापालिकेत विशेष सभेला येणार आहेत. अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होणार आहे. या सभेत समिती सदस्यांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)नेत्यांचा विश्वास उडालाआघाडी अभेद्य आहे म्हणणाऱ्या नेत्यांनी स्थायी व परिवहन समितीवरील काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्यच्या सदस्यांना अधिकृत उमेदवारांना मतदान करण्याचा व्हिप बजावला. व्हिप डावलून निवडणूक लढविली अथवा बंडखोर उमेदवारांना मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांविरुद्ध पक्षाच्या गटनेत्यांकडून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस महापौरांकडे करण्यात येईल, असेही अनेक सदस्यांना बजावण्यात आले. सभापती निवडणुकीवेळी हात वर करून मतदान करायचे आहे. त्यामुळे कोणी विरोधात मतदान केले हे त्याचवेळी सभागृहात स्पष्ट होणार होते. तरीही नेत्यांनी ‘रिस्क’ नको म्हणून सदस्यांना सहलीवर धाडले. याचा अर्थ नेत्यांचा सदस्यांवर किंवा सदस्यांचा नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. - माजी नगरसेवक, रमेश पुरेकर