गडहिंग्लज :
हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी या नद्यांना वारंवार येणाऱ्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होत आहे. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील पूरस्थितीबाबत ठोस निर्णय घेऊन पूरबाधितांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रसेवा दलाच्या गडहिंग्लज शाखेतर्फे करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार दिनेश पारगे यांना शिष्टमंडळाने भेटून हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात, शासनाने पूरग्रस्तांना तातडीने भरीव आर्थिक मदत व आश्रय द्यावा, पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमून समितीच्या शिफारसी व निष्कर्षांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
शिष्टमंडळात राष्ट्रसेवा दलाचे तालुकाध्यक्ष ज्ञानराजा चिघळीकर, अरविंद बारदेस्कर, साताप्पा कांबळे, गणपतराव पाटोळे, प्रकाश भोईटे, बाळासाहेब मुल्ला, रमजान अत्तार, उज्वला दळवी, शिवाजीराव होडगे, गीता पाटील यांचा समावेश होता.
--------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे राष्ट्रसेवा दलातर्फे तहसीलदार दिनेश पारगे यांना उज्वला दळवी यांच्याहस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी ज्ञानराजा चिघळीकर, साताप्पा कांबळे, अरविंद बारदेस्कर, प्रकाश भोईटे, शिवाजी होडगे उपस्थित होते.
क्रमांक : २९०७२०२१५-गड-०५