शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिरात कायमस्वरूपी लखलखाट

By admin | Updated: September 30, 2016 01:34 IST

दीपमाळा उजळल्या : विद्युतरोषणाईसाठी दोन कोटींची तरतूद

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात आता कायमस्वरूपी लखलखाट असणार आहे. मंदिरावर विविध रंगसंगतीची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यासाठी शासन व देवस्थान समितीच्यावतीने त्यासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी अंबाबाई मंदिर परिसरातील दीपमाळा विविध रंगांच्या प्रकाशझोतांनी उजळून निघाल्या.साडेतीन शक्तिपीठातील एक देवता असलेल्या अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. मंदिराचा विकास आणि कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी महापालिका व देवस्थान समितीच्यावतीनेही पुढाकार घेऊन नव्या सुधारणा केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी पुढाकार घेऊन अंबाबाई मंदिराला कायमस्वरूपी आकर्षक विद्युत रोषणाईचा विचार समितीच्या बैठकीत मांडला. गतवर्षीच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, नवरात्रौत्सव तोंडावर असल्याने त्यावेळी हा विचार बदलण्यात आला. मात्र, काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापुढे आकर्षक विद्युत रोषणाईचा प्रस्ताव मांडला. चंद्रकांतदादा पाटील यांनीही त्याला तातडीने मान्यता दिली. विविध रंगसंगती असलेली आकर्षक विद्युत रोषणाई कायमस्वरूपी ठेवण्यासाठी २ कोटींचा निधी लागणार आहे. त्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी शासनाकडून १ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आणि देवस्थान समितीने १ कोटींची तरतूद केली आहे. येत्या पाच-दहा दिवसांत या विद्युत रोषणाईचे टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही विद्युत रोषणाई पौर्णिमा, शुक्रवार, दसरा, दिवाळीसह वर्षभरातील महत्त्वाच्या सणांना लावण्यात येणार आहे. मात्र, सध्यातरी ए-वन डेकोरेटर्सकडून मंदिराला विद्युत रोषणाई केली जात आहे. या विद्युत माळा जोडण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू असून पावसामुळे त्यात वारंवार व्यत्यय येत आहे. मात्र, गुरुवारी मंदिर परिसरातीलदीपमाळा विविध रंगांच्या प्रकाशझोतांनी उजळून निघाल्या.वॉकी-टॉकी आणि हँड मेटल डिटेक्टर देशातील दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रात अंबाबाई मंदिराला अधिकची सुरक्षा देण्यात येत आहे. त्यासाठी देवस्थान समितीच्यावतीने पोलिसांना व देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांना १० हँड मेटल डिटेक्टर व १५ वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. तास मुबलक पाणी देवस्थान समितीच्या मागणीनुसार महापालिकेच्यावतीने अंबाबाई मंदिराला २४ तास पाणी पुरवण्यात येत असून गुरुवारी या पाईपलाईनची जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंदिरात पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही. इंडो काऊंट कंपनीने ५ लाखांचे वॉटर एटीएम मशीन भक्तांच्या सोयीसाठी देणगी स्वरुपात दिले असून त्याचीही जोडणी करण्यात आली. पाच हजार लिटर पाण्याची क्षमता असलेल्या या टाकीचे बटण दाबले की प्युरिफाय झालेले स्वच्छ पाणी भक्तांना मिळणार आहे. याशिवाय मंदिर परिसरात १ हजार लिटरच्या पाच टाक्या बसवल्या आहेत.