शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:18 IST

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या तपासण्या, ऑनलाईन माहिती भरणे, संपर्क शोध, आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहूजी ...

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या तपासण्या, ऑनलाईन माहिती भरणे, संपर्क शोध, आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ते बोलत होते. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रोज १५ हजारांहून अधिक तपासण्या होत आहेत. शहरासह ग्रामीण भागात तपासण्यांची संख्या वाढवून उद्दिष्ट पूर्ण करा. त्या-त्या भागासाठी देण्यात आलेल्या 'टेस्टिंग किट्स' मधून आतापर्यंत झालेल्या तपासण्यांच्या नोंदी व शिल्लक किट्सची माहिती वेळोवेळी सादर करा. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीचे (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) प्रमाण वाढवावे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. उद्दिष्ट पूर्ण न केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एन. देवकर, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, अश्विनी सोनवणे-जिरंगे, आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले.

चौकट

सूक्ष्म नियोजनाने काम करा

जिल्ह्याचा ‘पॉझिटीव्हिटी रेट’ कमी होण्यासाठी संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांनी ‘सूक्ष्म नियोजन’ करून समन्वयाने काम करावे. अधिकाधिक नागरिकांच्या तपासण्या करून घेऊन 'डाटा एन्ट्री' करावी. या कामासाठी आवश्यक ते मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.