शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींनी लसीकरण मोहीम राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST

गडहिंग्लज : लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊनची बंधने शिथिल करता येतील. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, ...

गडहिंग्लज : लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊनची बंधने शिथिल करता येतील. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी मोफत लसीकरण मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी केले.

गडहिंग्लज विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक झाली.

मुश्रीफ म्हणाले, निर्बंध शिथिल करण्यासाठी सर्वत्र किमान ७० टक्के लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. खासगी संस्था, बँका, आस्थापनांनीदेखील आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना मोफत लस उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

गडहिंग्लज, आजरा आणि चंदगडमधील शासकीय रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली असून अन्य आरोग्य सुविधादेखील उपलब्ध केल्या आहेत. बैठकीस गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसीलदार दिनेश पारगे,

गटविकास अधिकारी शरद मगर,

मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप आंबोळे, डॉ.चंद्रकांत खोत,माजी जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लज बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई उपस्थित होते.

गडहिंग्लज कारखानाही चालला पाहिजे !

शेतकरी आणि कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न कारखान्याशी निगडित असल्यामुळे आजऱ्याच्या संचालकांनी चांगला निर्णय घेतला. त्याचप्रमाणे गडहिंग्लज कारखानादेखील चालला पाहिजे, अशीच आपली भूमिका आहे. त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करायला तयार आहे, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी पुन्हा दिली.