शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जलव्यवस्थापनात लोकांचा दबावगट हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:01 IST

गडहिंग्लज : जलसंपदेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाचीच आहे; परंतु नियोजन आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या अभावामुळे ८० टक्के पाणी वाया जात आहे. लोकसहभागाच्या नावाखाली ही जबाबदारी लोकांवरच टाकली जात आहे. मग यंत्रणा काय करणार? असा सवाल करतानाच यासंदर्भात जनजागृतीबरोबरच लोकांनी दबावगट म्हणून काम करावे आणि शासकीय यंत्रणा कामाला लावावी, असा सल्ला जलतज्ज्ञ प्रदीप ...

गडहिंग्लज : जलसंपदेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाचीच आहे; परंतु नियोजन आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या अभावामुळे ८० टक्के पाणी वाया जात आहे. लोकसहभागाच्या नावाखाली ही जबाबदारी लोकांवरच टाकली जात आहे. मग यंत्रणा काय करणार? असा सवाल करतानाच यासंदर्भात जनजागृतीबरोबरच लोकांनी दबावगट म्हणून काम करावे आणि शासकीय यंत्रणा कामाला लावावी, असा सल्ला जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी दिला.गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर फौंडेशनतर्फे कै. केदारी रेडेकर जीवन गौरव पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. याप्रसंगी ‘जलव्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फौंडेशनच्या अध्यक्षा अंजना रेडेकर होत्या. पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि नद्या-नाले वाहते ठेवून निसर्गाचे जलचक्र अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.पुरंदरे म्हणाले, २००५ मध्ये जलनियमनाचा कायदा होऊनदेखील १३ वर्षांत अजूनही जलआराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही. राज्यातील बांधकामाधिन सुमारे ४०० प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी सुमारे ७५ हजार कोटींची गरज आहे. तरीदेखील १९१ नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. सुधारित प्रशासकीय मंजुरीनुसार त्यासाठी ६८ हजार कोटी लागणार आहेत. मग, हे प्रकल्प कधी आणि कसे पूर्ण होणार? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळेच जलव्यवस्थापन आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणे गरजेचे आहे. यावेळी उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, प्राचार्या डॉ. वीणा कंठी, श्रद्धा शिंत्रे, कॉ. दत्ता अत्याळकर, विष्णुपंत केसरकर, अरुण देसाई, सतीश पाटील, नागेश चौगुले, आदी उपस्थित होते. रेडेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.सुभाष धुमे यांनी स्वागत केले. फौंडेशनचे सचिव प्रा. सुनील शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. एस. डी. पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला. अ‍ॅड. सयाजी पाटील यांनी मानपत्र वाचन केले. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनंत पाटील यांनी आभार मानले.पुरस्काराची रक्कम ‘चळवळी’लापुरंदरे यांनी २१ हजारांच्या पुरस्कारात स्वत:चे चार हजार घालून २५ हजार रुपयांची मदत रेडेकर फौंडेशनने हाती घेतलेल्या पाण्याच्या चळवळीसाठी दिली. रोख २१ हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.