राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार कळे न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीमार्फत शनिवार (दि. २५) रोजी कळे - खेरीवडे न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे, एनआय ॲक्ट चेक बाऊन्स प्रकरणे, कौटुंबीक प्रकरणे, दरखास्त प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँकेची प्रकरणे, ग्रामपंचायतीकडील थकीत घरफाळा, पाणीपट्टी वसुली प्रकरणे आपापसात, सहमतीने तडजोड करून मिटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सर्व पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रमाणात या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन आपली प्रकरणे सामोपचाराने मिटवावीत, असे आवाहन अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय, कळे न्यायाधीश विनोद खुळपे यांनी केले आहे.