शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
5
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
6
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
7
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
8
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
9
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
10
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
11
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
12
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
13
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
14
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
15
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
16
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
17
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
18
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
19
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
20
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले

Kolhapur Election: शिवाजी पेठेतील जनता धनशक्तीवाल्यांना गारद करील : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:14 IST

शिवाजी पेठेतील स्वाभिमानी जनतेने गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या धनशक्तीस गारद करण्यासाठी कंबर कसली आहे

ठळक मुद्देशिवाजी पेठ परिसरात संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ फेरी

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील स्वाभिमानी जनतेने गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या धनशक्तीस गारद करण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढ्यात शिवाजी पेठ शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या बाजूने असल्याने विरोधकांचा टिकाव लागणार नाही, असा टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी येथे लगावला.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठ परिसरात आयोजित प्रचारफेरी प्रसंगी ते बोलत होते.सकाळी प्रचारफेरीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली. यावेळी मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन करीत ही प्रचारफेरी पुढे उभा मारुती चौक, साकोली कॉर्नर, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक, गांधी मैदान, फिरंगाई मंदिर, आठ नंबर शाळा, जुना वाशी नाका, खंडोबा तालीममार्गे झुंजार क्लब येथे येऊन समाप्त करण्यात आली.

प्रचारफेरीत माजी महापौर विलासराव सासने, अशोकराव जाधव, माजी नगरसेविका भारती पोवार, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक मंगलताई साळोखे, दीपक गौड, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, धनाजी दळवी, अमित चव्हाण, सुनील भोसले, नीलेश गायकवाड, भाई जाधव, सुनील टिपुगडे, योगेश चौगुले, पीयूष चव्हाण, विश्वदीप साळोखे, प्रशांत जगदाळे, कपिल सरनाईक, शैलेश साळोखे, रूपेश इंगवले, राहुल इंगवले, पिंटू साळोखे, विनय दळवी, हृषिकेश इंगवले, सुकुमार लाड, मयूर गवळी, आदी सहभागी झाले होते.जुना बुधवार पेठ परिसरात आज प्रचारफेरीप्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता जुना बुधवार पेठ परिसरात प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. प्रचारफेरीची सुरुवात तोरस्कर चौक येथून करण्यात येणार आहे. ही फेरी पुढे जुना बुधवार तालीम, शहीद भगतसिंग चौक, मृत्युंजय तरुण मंडळ, बुरुड गल्ली कॉर्नर, जोशी गल्ली चौक, बजाप माजगावकर तालीम, पापाची तिकटी मेन रोड, कोल्हापूर महानगरपालिका- काळा इमाम तालीम- सम्राट चौकमार्गे शिवसेना शहर कार्यालय येथे समाप्त होणार आहे. कोल्हापूर मतदारसंघातील शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गुरुवारी शिवाजी पेठेतून प्रचारफेरी काढण्यात आली. यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर, संजय मंडलिक, सुरेश साळोखे, रविकिरण इंगवले, आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना