शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग

By admin | Updated: September 20, 2014 00:28 IST

बिदरी : किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवात विविध पुरस्कारांचे वितरण

कोल्हापूर : पर्यावरणाचा जेव्हा ऱ्हास होतो किंवा नदीचे प्रदूषण होते, त्यावेळी फक्त स्थानिक प्रशासनाला दोष दिला जातो; पण पर्यावरण संवर्धन ही फक्त प्रशासनाच्या प्रयत्नाने साधणारी गोष्ट नाही, तर त्यासाठी लोकसहभागही आवश्यक आहे. कोल्हापूरकरांनी लोकसहभागातून ही चळवळ पुढे नेली याचा मला विशेष अभिमान आहे, असे मत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केले.शाहू स्मारक भवनात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्या बोलत होत्या. यावेळी गजानन जोशी, मिलिंद यादव आणि ‘देवराई’ या संस्थेला वसुंधरा मित्र पुरस्काराने, तर राणिता चौगुले, भाग्यश्री पाटील, आबा कांबळे यांना वसुंंधरा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संयोजक वीरेंद्र चित्राव, चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, कृष्णा गावडे, प्रकाश राव उपस्थित होते.बिदरी म्हणाल्या, अनेकदा नागरिक एखाद्या प्रश्नावरून प्रशासनाशी फक्त भांडतात; पण त्याबद्दल उपाय सांगत नाहीत; पण सुदैवाने कोल्हापुरातील पर्यावरणवादी लोक उपाययोजना सांगतात, त्यात सक्रिय होतात. पंचगंगा प्रदूषणाचा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. मात्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात प्रशासनाला यश आले. एक नागरिक म्हणून आपण कधी नदी, नाले, ड्रेनेज बघायला जात नाही; पण अधिकारी म्हणून मी कोल्हापुरात हे सगळं पाहिलं आणि खूप काही शिकलेही. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, आम्ही कोडोली मतदारसंघात प्लास्टिकमुक्तीसाठी महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे आम्ही हा उपक्रम यशस्वीपणे राबवू शकलो. आबा कांबळे यांनी गो-हत्या बंदीप्रमाणेच गाय-म्हैस अशा जनावरांच्या विक्रीवरही बंदी आणली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. उदय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. महोत्सवात आज दिवसभरात अरायव्हिंग, ग्रिनी द ग्रेट, टिंबकटू, रिटर्न आॅफ द क्लाउडेड असे ११ लघुपट दाखविण्यात आले. (प्रतिनिधी)कोल्हापूर : येथील श्री भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्र आणि शॅल्बी हॉस्पिटल्स् (अहमदाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२१) सकाळी दहाला सम्राटनगरमधील उपचार केंद्रात मोफत गुडघे तपासणी शिबिर होणार आहे. उपचार केंद्राच्या दशकपूर्तीनिमित्त राजस्थानी जैन श्वेतांबर समाजाने या शिबिराचे आयोजन केले आहे.या केंद्राच्या दवाखान्याची सुरुवात डॉ. अशोक शहा, विकास पारेख यांनी केली. याठिकाणी दहा रुपये इतक्या अल्पमोबदल्यात रुग्णांची तपासणी आणि दोन दिवसांचे औषध दिले जाते. येथे डॉ. नीलेश शहा, रोहन अथणे, अपर्णा जामकर, अपर्णा तिवडे व परिचारिका संगीता सावंत, रंजना यादव कार्यरत आहेत. सकाळी दहाला डॉ. श्रीधर देवधर यांचे व्याख्यान, डॉ. गज्जर, श्रीरंग देवधर, जयेश पाटील रुग्णांची तपासणी करणार आहेत. शिबिरात येताना रुग्णांनी गुडघ्याचा डिजिटल एक्स-रे आणणे गरजेचे आहे. शिबिरासाठी रुग्णांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सम्राटनगरमधील उपचार केंद्राशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)