शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कागलमधील जनतेने धाडसी निर्णय घ्यावा

By admin | Updated: January 22, 2017 00:36 IST

समरजितसिंह घाटगे : एक संधी द्या; विकास काय असतो ते दाखवितो

सेनापती कापशी : राजकारणातून कोणाला तरी संपविण्यासाठी नव्हे, तर राजे गटाला मोठे करण्यासाठी मी स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या रूपाने मी कागल तालुक्यातील जनतेला सक्षम पर्याय देत आहे. या निवडणुकीत माझ्या घरचा कोणीही उमेदवार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देणार असल्यामुळे जनतेने धाडसी निर्णय घ्यावा. फक्त मला एकदा संधी द्यावी; विकास काय असतो ते मी तालुक्यातील जनतेला दाखवितो, असे प्रतिपादन समरजितसिंह घाटगे यांनी केले.ते सेनापती कापशी (ता. कागल) येथे वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ व चिकोत्रा खोऱ्यातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती उदयसिंह घोरपडे होते.घाटगे म्हणाले, येत्या पाच ते सहा दिवसांत तालुक्यातील सर्व १५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असून, गेली ३० ते ३५ वर्षे राजकारण करणाऱ्यांनी विकासाचे मुद्दे मांडावेत. जनतेनेही ठोस विकास आणि मुद्द्यावरच मते टाकावीत. चिकोत्रा खोऱ्यात आता ‘कमळ’ फुलविल्याशिवाय थांबायचे नाही.उदयसिंह घोरपडे म्हणाले, राजे गट हा तात्त्विक विचारधारा जोपासणारा गट आहे. ही विचारांची लढाई आहे. समरजित घाटगेंचे नेतृत्व व्यापक असून, त्यांनी कागल तालुक्याचे नेतृत्व करावे. यावेळी उमेश देसाई, राजाभाऊ माळी, संजय बरकाळे, बाळासो काटकर (चिखली), शुभांगी काटकर (चिखली), अनिल भोसले (चिखली), सुरेश मांगोरे, संतोष शेळके (जैन्याळ), आदींनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.राजाभाऊ माळी, सुजाताताई देसाई, संदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केले, तर शिबिराज शिवूडकर यांनी आभार मानले. वाढदिवसानिमित्त समरजित घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. आनंदा मांगले, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, बॉबी माने, संदीप पाटील, केरुआबा कांबळे, राजेंद्र सरनाईक, तानाजी कुरणे उपस्थित होते. (वार्ताहर)पाणी समस्या सोडविण्यासाठीच भाजपमध्ये : देसाईचिकोत्रा खोऱ्याची भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. चारही बाजूने डोंगर आहे. येथे पाऊसही मुबलक पडतो; पण गेली ३0 ते ३५ वर्षे राजकारण करणाऱ्या नेत्यांना पाण्याचे नियोजन का जमले नाही. चिकोत्रा खोऱ्याची पाणी समस्या मोठी आहे. समरजितसिंह घाटगेंनी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा व विकासाचे राजकारण तालुक्यात सुरू केले. यामुळेच आम्ही कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे उमेश देसाई यावेळी म्हणाले.सेनापती कापाशी (ता. कागल) येथे चिकोत्रा खोऱ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशप्रसंगी आयोजित कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अमरसिंह घोरपडे, उदयबाबा घोरपडे, राजाभाऊ माळी, उमेश देसाई, केरुआबा कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.