शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

‘गडहिंग्लज’मध्ये लोक माहिती अभियान

By admin | Updated: November 5, 2015 00:01 IST

६ ते ८ नोव्हेंबरला आयोजन : केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम

गडहिंग्लज : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाच्यावतीने दिनांक ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान गडहिंग्लज येथे ‘लोक माहिती अभियान’ आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रसारणचे वरिष्ठ अधिकारी सय्यद अख्तर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी कुणाल खेमणार, तहसिलदार हनुमंतराव पाटील आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना अख्तर यांनी सांगितले की, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांच्या सहकार्याने देशभरात शंभरहून अधिक ठिकाण लोक माहिती अभियानाचे आयोजन करण्यात येते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहचाव्यात तसेच योजनांची अंमलबजावणी करणारी कार्यालये व लाभार्थी यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा हा या अभियानाचा उद्देश आहे.दिनांक ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या अभियानात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करणारी केंद्र सरकार, राज्यशासन, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची कार्यालये, महामंडळे, बँका तसेच स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. विविध ५० स्टॉल्सच्या माध्यमातून निरनिराळ्या शासकीय योजनांची माहिती लोकांना दिली जाणार आहे. तीन दिवसाच्या अभियानात पहिल्या दिवशी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच शेतकरी मेळावा, दुसऱ्या दिवशी महिला मेळावा व तिसऱ्या दिवशी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध विभागांचे तज्ज्ञ ग्रामीण विकास, आरोग्य, कृषि आदी विषयक योजना, रोजगार, एकात्मिक बालविकास, कौशल्य वर्धन आदींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सर्वांना मोफत प्रवेश असून अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. (वार्ताहर)विनामूल्य आरोग्य सेवाअभियानादरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि जिल्हा रूग्णालयाकडून तीनही दिवस रक्तगट तपासणी, डोळे तपासणी तसेच कान तपासणी आदी सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत.मनोरंजनातूनही जनजागृतीया तीन दिवसांत गीत व गायक विभागातर्फे मनोरंजनातून जनजागृतीचे कार्यक्रम सायंकाळी ५ ते ९ यावेळेत आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह मराठी चित्रपटांचा समावेश आहे.