शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

‘शेळी-कुक्कुटपालन’ लाभार्थी निवड प्रलंबित

By admin | Updated: January 14, 2015 00:32 IST

पशुसंवर्धन उपायुक्त : लाभार्थ्यांचे प्रस्ताव रखडले

आयुब मुल्ला - खोची -मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे जिल्ह्यात शेळी व कुक्कुटपालन व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांची निवडच झालेली नाही. पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात लाभार्थ्यांचे सुमारे एक हजार प्रस्ताव पेंडिंग पडले आहेत. व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्यांची मात्र जिल्हा पशुसंर्वधन कार्यालयात हेलपाटे मारून दमछाक होऊ लागली आहे. निवड झाल्यानंतर तुम्हाला कळविले जाईल, अशीच उत्तरे त्यांना मिळत आहेत. चालू आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिने उरले असताना चालू वर्षांत एकाही लाभार्थ्यांची निवड न होणे ही गंभीर बाब असून, किमान जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न निकालात काढावा, अशी मागणी होत आहे. चालू वर्षाासाठी जिल्ह्याला शेळी व कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी अनुक्रमे ५० व २९ इतके लाभार्थी निवडण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. त्यानुसार दोन्हींचे सुमारे एक कोटी रुपयांचे अनुदानही उपलब्ध आहे; परंतु लाभार्थ्यांची निवडच झाली नसल्याने सारे काही जैसे थे आहे. यास प्रामुख्याने कार्यालयात अपुरी कर्मचारी संख्याच कमी असल्याचे कारण आहे. शासनाने या लाभार्थ्यांकडून ३० आॅगस्ट २०१४ अखेर प्रस्ताव दाखल करून घेण्याची मुदत दिली होती. तद्नंतर १ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. अखेर तालुकानिहाय जिल्हा कार्यालयात प्रस्ताव दाखल झाले; परंतु त्यामध्ये त्रुटींचे कारण दाखवित ते प्रस्ताव पुन्हा तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले. त्रुटी दुरुस्त करून ते दाखल करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा कार्यालयात प्रस्ताव दाखल झाले आहेत. जिल्हा कार्यालयाने पात्र, अपात्र नावे काढली असल्याचे समजते; परंतु प्रस्ताव आहेत शेकडोंंच्या घरात अन् निवड करायची संख्या कमी आहे. दोन्ही मिळून ७९ इतकी असल्यामुळे याचा निर्णय लॉटरी पद्धतीने होणार आहे. प्रस्ताव पात्र आहेत; पण लॉटरीत नाव बसणे आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा निर्णय हा अधांतरीच असल्याची चिंताही प्रस्ताव दाखल केलेल्यांना आहे, तरी सुद्धा ते आशावादी आहेत. दोन्ही योजना फायदेशीर आहेत. यापूर्वी निवड झालेल्या लाभार्थ्यांची व्यवसायामुळे चांगली प्रगती झाली आहे. चालू वर्षात लाभार्थी निवडण्यास उशीर झाला आहे. यासाठी अनेक पदे भारतीय नसल्याचे प्रमुख कारण आहे. अतिरिक्त कार्यभारामुळे उशीर होत गेला आहे. येत्या पंधरा दिवसांत संपूर्ण प्रक्रिया होऊन लाभार्थी निवडले जातील. - डॉ. एस. एस. बेडकयाळे, उपायुक्त - पशुसंवर्धन विभागअंतिम लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. याचे सदस्य सचिव, उपायुक्त, तर सदस्य म्हणून समाजकल्याण, आदिवासी, रोजगार व स्वयंरोजगार, जिल्हा पशुसंवर्धन, महिला बालकल्याण या विभागाचे अधिकारी आहेत. या सर्वांसमोर प्रस्तावांची यादीच गेलेली नाही. कारण पात्र लाभार्थी तयार करण्यासाठी आवश्यक असणारी कर्मचारी संख्याच अपुरी आहे. या कार्यालयाचे प्रमुख उपायुक्त हे पद दीड वर्षांपासून रिक्त आहे. तसेच विकास अधिकाऱ्यांची १८८ पैकी ५५ पदे रिक्त असल्यामुळे अन्य योजना राबविण्यावरही परिणाम झाला आहे.