शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहा वाहनचालकांना दंड

By admin | Updated: January 7, 2015 00:26 IST

अवैध गौणखनिज उत्खनन : भुदरगड तहसील भरारी पथकाचे छापे

गारगोटी : भुदरगड तालुक्यात अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करणाऱ्या दहा वाहनांसह चालकांवर तहसील विभागाच्या भरारी पथकाने आज, मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे ही कारवाई करण्यात आली. भुदरगड तालुक्यात वाळू, माती, दगड यांची मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाहतूक सुरू असते. या विरोधात नदीकाठालगतच्या लोकांच्या सतत तक्रारी असतात पण, हे वाहतूक करणारे गावातीलच वाहनधारक असल्याने उघड-उघड विरोध होत नव्हता. शिवाय गारगोटी-कोल्हापूर महामार्गावरील कूर नदीवरील पुलाशेजारी बिनदिक्कतपणे वाळू उपसा भरदिवसा पहाटे सुरू असतो. गत महिन्यात याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कारवाईचे आदेश दिले. आज सकाळी निवासी नायब तहसीलदार सदानंद महाडिक, नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे, एच. आर म्हेत्रे यांच्या देखरेखीखाली पाच मंडल अधिकारी व वीस तलाठ्यांची पथके करण्यात आली. सकाळी सहा वाजता गोपनीयता राखत वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून आठ ट्रॅक्टर व दोन डंपर पकडण्यात आले. ही सर्व वाहने विनापरवाना गौण खनिज उत्खनन करीत होती. तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार व मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलिसपाटील काम करीत आहेत. ७८ हजाराचा दंड वसूलकारवाईमध्ये जगन्नाथ एकशिंगे(माजगाव), रवींद्र कांबळे (कणसवाडी), सुभाष सूर्यवंशी (पाथर्डे), संतोष हळदकर, सुशांत हळदकर (कूर), देसाई (मडलगे), नामदेव कोळी, गणपतराव जाधव (शेणगाव), सीताराम वर्पे (वर्पेवाडी) उत्तम मेंगाणे (मडिलगे खुर्द) या दहा वाहनचालकांसह दोन वाहनांना ७८ हजार ४०० रुपये दंड करण्यात आला.