शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकाळणी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:59 IST

जोतिबा : ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा पाकाळणी रविवार उत्साहात साजरी झाली. आज, सोमवारी मंदिर स्वच्छता करून उद्या, मंगळवारी महाप्रसाद वाटपाने चैत्र यात्रेची सांगता होणार आहे. जोतिबा देवाचा तिसरा रविवार पाकाळणीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी जोतिबा मंदिरात मोठी गर्दी केली. सकाळी अभिषेक, महापूजा, धुपारती सोहळा झाला. मंदिरासभोवती चारपदरी दर्शनरांगा लागल्या होत्या. दुपारी १२नंतर मंदिराबाहेरील ...

जोतिबा : ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा पाकाळणी रविवार उत्साहात साजरी झाली. आज, सोमवारी मंदिर स्वच्छता करून उद्या, मंगळवारी महाप्रसाद वाटपाने चैत्र यात्रेची सांगता होणार आहे. जोतिबा देवाचा तिसरा रविवार पाकाळणीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी जोतिबा मंदिरात मोठी गर्दी केली. सकाळी अभिषेक, महापूजा, धुपारती सोहळा झाला. मंदिरासभोवती चारपदरी दर्शनरांगा लागल्या होत्या. दुपारी १२नंतर मंदिराबाहेरील ठाकरे मिटके गल्लीपर्यंत दर्शनरांग लागली. सायंकाळी सात वाजता धुपारती झाली. रात्री ८.३० वाजता जोतिबा देवाची पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. श्रींचे मुख्य पुजारी, उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह पालखी निघाली. भाविकांनी गुलाल, खोबऱ्यांची उधळण करून ‘चांगभलं’चा गजर केला. यावेळी देवस्थान समिती कार्यालयाचे प्रभारी महादेव दिंडे, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी आर. टी. कदम, गावकर, ग्रामस्थ, पुजारी व भाविक उपस्थित होते. तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता झाली.रात्री दहा वाजता स्थानिक ग्रामस्थ पुजारी ‘खंडकरी’ सेवा मंडळाच्या ५०० ते ६०० कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे हातात झाडू घेऊन संपूर्ण मंदिराची स्वच्छता केली. रात्री उशिरापर्यंत ही स्वच्छता मोहीम चालू होती.आज नित्य पारंपरिक पद्धतीने पाण्याचे फवारे मारून मंदिर स्वच्छ केले जाणार आहे. मंदिर गाभारा, शिखरे, दीपमाळ, देवता कृत्य साहित्यांची स्वच्छता केली जाणार आहे. मंदिरातील विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. काही काळ जोतिबा दर्शन बंद राहील. उद्या जोतिबा समस्त पुजारी यांच्यावतीने गाव भंडारा होणार आहे. भाविकांनी या गाव भंडारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानाचे दहा गावकरी यांनी केले आहे. दुपारी दोन वाजता स्थानिक पुजारी मंडळाच्या सासनकाठीची मिरवणूक निघेल. रात्री भजन व डवरी गीतांचा कार्यक्रम होईल.