शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेकापची उसाला साडेतीन हजारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 14:51 IST

यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रतिटन किमान ३५०० रुपये भाव मिळाला पाहिजे, असा ठराव करत राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकार फसवे असल्याची टीका माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी कोल्हापुरात केली.

ठळक मुद्देभारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात ठराव सत्ताधारी फसवे : संपतराव पवार यांची टीकाकर्जमाफी म्हणजे लबाडाघरचे आवतण कारखान्यांनी भागविकास निधी घेऊ नये, प्रसंगी रस्त्यावर उतरू

कोल्हापूर : यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रतिटन किमान ३५०० रुपये भाव मिळाला पाहिजे, असा ठराव करत राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकार फसवे असल्याची टीका माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी कोल्हापुरात केली.

ते भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात बोलत होते. टेंबे रोड येथील पक्षाच्या कार्यालयात हा मेळावा झाला. यावेळी माजी जि. प. सदस्य बाबासाहेब देवकर, भारत पाटील, केरबा पाटील, बाबूराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संपत पवार-पाटील म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने शंभर दिवसांत ‘अच्छे दिन’ आणण्याचे अभिवचन दिले होते. राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी होईल की नाही हे सांगता येत नाही. शेतकरी, बेरोजगारांना हे सरकार नुसते आश्वासन देत आहे. त्यामुळे हे सरकार फसवे आहे.

शासनाने कर्जमाफीच्या अटी व निकषांमध्ये वारंवार बदल केल्याने शासकीय यंत्रणासुद्धा संभ्रमात आहे. त्यामुळे कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचे आवतण होय. त्याचबरोबर कारखान्यांनी भागविकास निधी घेऊ नये, प्रसंगी रस्त्यावर उतरू.

मेळाव्यात अंबाजी पाटील, अजित देसाई, एकनाथ पाटील, डॉ. संपत पाटील, शामराव मुळीक, शामराव पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुशांत बोरगे यांनी आभार मानले.मेळाव्यातील ठराव...

 

  1.  दि. २० सप्टेंबर २०१७ च्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत ऊस दराच्या रकमेतून भागविकास निधी प्रतिटन तीन टक्के किंवा ५० रुपये व मुख्यमंत्री सहाय्य निधी चार रुपये होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यास आमचा विरोध असून तशी कोणतीही कपात ऊस बिलातून करू नये.
  2.  एफआरपीची रक्कम कारखाने सुरू होण्यापूर्वी कारखानानिहाय शासनाने १५ आॅक्टोबरपूर्वी जाहीर करावी
  3. खरीप हंगामातील पिकांची आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी आठवडी बाजाराच्या ठिकाणी शासनाने खरेदी केंद्रे सुरू करून त्याची शासनाच्यावतीने प्रसिद्धी करावी.
  4.  अनियमित पाऊस व अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून शेतकºयांना भरपाई देण्याची कार्यवाही करावी.
  5.  शेती पंपाची प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करून सध्याचेच दर तीन वर्षांसाठी कायम ठेवावेत
  6.  महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने शेतीच्या पाणीपट्टीमध्ये सुचविलेली २० टक्के दरवाढ रद्द करावी
  7.  गॅस, डिझेल व पेट्रोलचे कमी करावेत.