शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

राज्यातील वृद्ध खेळाडूंना मानधन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST

कोल्हापूर : हिंद केसरी,महाराष्ट्र केसरीसह राज्यातील सर्व वृद्ध खेळाडूंना प्रतिमहिना मिळणारे मानधन रक्कम वाढवून ती नियमित द्यावी. गेल्या आठ ...

कोल्हापूर : हिंद केसरी,महाराष्ट्र केसरीसह राज्यातील सर्व वृद्ध खेळाडूंना प्रतिमहिना मिळणारे मानधन रक्कम वाढवून ती नियमित द्यावी. गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तत्काळ द्यावे अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली.

हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरी व अन्य खेळातील वृद्ध खेळाडूंना मिळणारे मानधन अत्यल्प आहे. कोरोना काळात ते गेल्या आठ महिन्यांपासून थकीत आहे. ते नियमितपणे द्यावे. अशी मागणी आमदार पाटील यांनी क्रीडा मंत्री केदार यांची भेट घेऊन केली. महाराष्ट्र व हिंद केसरी मल्लांना प्रतिमहिना सहा, तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना चार आणि राष्ट्रीय खेळाडूंना अडीच हजार मानधन दिले. हे अत्यल्प आहे. त्यामुळे ते वाढवून त्वरित द्यावे. गेल्या जुलै २०२० पासून मानधन या ज्येष्ठ खेळाडूंना मिळालेले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांनी क्रीडा मंत्री केदार यांची बुधवारी दुपारी भेट घेतली. हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन क्रीडामंत्री केदार यांनी आमदार पाटील यांना दिले.

फोटो : ०३०३२०२१-कोल-ऋतुराज पाटील

आेळी : राज्यातील वृद्ध खेळाडूंना प्रलंबित मानधन त्वरित द्यावे या मागणीसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांची बुधवारी भेट घेतली.