शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार भरा, कोणीही बांधकाम कामगार व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:58 IST

नसीम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शासनाकडून पैसे मिळत आहेत म्हटल्यावर आपल्या नावापुढे ‘बांधकाम कामगार’ असे पद ...

नसीम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शासनाकडून पैसे मिळत आहेत म्हटल्यावर आपल्या नावापुढे ‘बांधकाम कामगार’ असे पद लावण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. करवीर तालुक्यातील एक आख्खे गावच ‘बांधकाम कामगार’ म्हणून नोंदीत झाल्याचा प्रकार घडला आहे! या प्रकारामुळेच एरव्ही नोंदणी करताना ४० ते ५० हजारांच्या वर कधीही न जाणारा आकडा आता लाखाच्याही पुढे गेला आहे. दीड हजार भरले की बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होत आहे. एजंटांच्या सुळसुळाटामुळे बोगस कामगारांचे पेवच फुटले आहे.आघाडी सरकारच्या काळात ‘बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ’ स्थापन करून त्याची नोंदणी सुरू झाली. कामगार संघटनांनी संघर्ष केल्याने वर्षभरापूर्वी शासनाने सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत पाच हजार रुपये रोख व १२ हजारांचे सुरक्षा किट असा आर्थिक लाभ देण्यास सुरुवात केली. त्यानंतर नोंदणीसाठी चढाओढ सुरू झाली. एजंटांचा वावर वाढला. हे एजंट १५०० रुपये भरल्यानंतर लगेच नोंदणी करून देत आहेत. ग्रामसेवक व कंत्राटदार यांच्या एका दाखल्यावर ही नोंदणी होत आहे.जिल्ह्यात ५० हजार बांधकाम असल्याचा प्राथमिक सर्व्हे आहे. यातील २५ हजार जणच आतापर्यंत नोंदणी आणि नियमितपणे नूतनीकरण करत आले आहेत; पण आता हा आकडा एक लाख पाच हजारांच्या पुढे गेला आहे. कोल्हापूर व इचलकरंजी अशा दोन ठिकाणी ‘कामगार कल्याण’ची कार्यालये आहेत. तेथे आतापर्यंत २८ हजार जणांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले आहे. यावरून बोगस कामगारांना लाभ दिल्याचे स्पष्ट होत आहे.नोंदीत कामगारासमिळणाऱ्या सुविधारोख पाच हजार रुपये, १२ हजारांचे सुरक्षा किट, नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख, तर अपघाती मृत्यूस पाच लाख, घरबांधणीकरिता दोन लाख, अंत्यविधीसाठी १० हजार, पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांना २५०० आणि आठवी ते दहावीपर्यंत ५०००; तसेच दहावी-बारावीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविल्यास १० हजार रुपये, १२ वीनंतर शैक्षणिक खर्चासाठी २० हजार, वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवीसाठी एक लाख, उपचारासाठी एक लाख, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभ मिळतात.अख्खे गावच बांधकाम कामगारांचे!करवीर तालुक्यातील बीडशेड गावात १०० टक्के नोंदणी झाली आहे. अशाप्रकारे नोंदणीबाबत ग्रामस्थांतूनच तोंडी तक्रार आली; पण रितसर तक्रार करा म्हटल्यावर गावकऱ्यांना अंगावर कोण घ्यायचे म्हणून हे प्रकरण असेच दडपले गेले.हे बांधकाम कामगारमिस्त्री, गवंडी, बिगारी, सेंट्रिंग, खुदाई, पेंटर, प्लंबर, सुतार, फरशी फिटिंग, फॅब्रिकेटर्स, इलेक्ट्रिक फिटर्स