शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष द्या, दक्ष रहा शरद पवार यांच्या स्थानिक नेत्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 11:04 IST

लोकसभेच्या कोल्हापुरातील दोन्ही जागा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक हालचालींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कसलीही गडबड होणार नाही याकरीता दक्ष रहा. काही दुरूस्त्या करायच्या

ठळक मुद्देकोल्हापूरच्या दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणीही गाफील राहू नका.ज्या कामात माझे सहकार्य लागेल त्यासंबंधी मला सांगा मी लक्ष देतो, असे पवार यांनी सांगितले.

कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापुरातील दोन्ही जागा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक हालचालींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कसलीही गडबड होणार नाही याकरीता दक्ष रहा. काही दुरूस्त्या करायच्या असतील तर त्या जरूर करा, पण गाफील राहू नका, अशा स्पष्ट सूचना राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील नेत्यांना बुधवारी सकाळी दिल्या.

पवार मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यांनी अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर सायंकाळी कॉँग्रेस, राष्टÑवादी, स्वाभिमानी संघटना व पक्ष,आरपीआय आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मार्गदर्शन केले. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता हेलिकॉप्टरने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रयाण केले.तत्पूर्वी येथील एका हॉटेलवर पवार यांनी जिल्ह्यातील राष्टवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, उद्योगपती व्ही. बी. पाटील, आदिल फरास, अनिल साळोखे अशा निवडक नेत्यांशी निवडणूक प्रचार यंत्रणा आणि तयारीसंबंधी अर्धा तास चर्चा केली. कोल्हापूरच्या दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणीही गाफील राहू नका. अजूनही काही दुरूस्त्या कराव्या लागत असतील तर त्या करा. ज्या कामात माझे सहकार्य लागेल त्यासंबंधी मला सांगा मी लक्ष देतो, असे पवार यांनी सांगितले. १२ एप्रिलला आपण पुन्हा कोल्हापूर दौºयावर येत असून त्या दिवशीच्या सभांचे नियोजन करण्याची जबाबदारी मुश्रीफ व महाडिक यांच्यावर त्यांनी सोपविली.

ही चर्चा सुरू असता तेथे आजºयाहून जयवंत शिंपी, मुकुंदराव देसाई पोहोचले. पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पंधरा मिनिटांच्या चर्चेत पवार यांनी त्यांना काही सूचना केल्या. पाठोपाठ माजी आमदार दिनकरराव जाधव व त्यांचे पुत्र सत्यजित जाधव पोहोचले. त्यांच्याशीही पवार यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. यावेळी मुश्रीफ, महाडिक उपस्थित होते. हॉटेलमधून खाली आल्यानंतर पवार यांना भेटायला आलेल्या उपमहाराष्ट केसरी मल्ल अमृता भोसले व काही पैलवानांची ओळख महाडिक यांनी करून दिली. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना प्रचारकार्यात सहभागी व्हा, असे आवाहन पवार यांनी केले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरने सोलापूरकडे जाण्याकरीता उड्डाण घेतले. कोल्हापूर दौºयावर आलेल्या राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची बुधवारी सकाळी माजी आमदार दिनकरराव जाधव व त्यांचे पुत्र सत्यजित जाधव यांनी भेट घेतली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर