शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर पवारांकडून कारवाईचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 01:14 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यादरम्यान मंगळवारी मिळाले आहेत.

ठळक मुद्देप्रक्रियेला प्रदेशाध्यक्षांकडून होणार प्रारंभ

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यादरम्यान मंगळवारी मिळाले आहेत.पवार यांनी दुपारी कोल्हापुरात आल्यापासून कोणकोणत्या तालुक्यांत कोणकोणते राष्ट्रवादीचे पदाधिकारी पक्षविरोधी काम करीत आहेत, त्याची माहिती घेतली आहे. त्यातून अशा सर्व विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत. यावरूनच कोल्हापूरची जागा पवार यांनी प्रतिष्ठेची मानली असल्याचे समजते.

राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्याकडे पवारयांनी कोल्हापूर, इचलकरंजीतील नगरसेवकांबाबत विचारणा केली. यावेळी आवाडे यांनी बहुतांशकाँग्रेसचे नगरसेवक हे प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात असल्याचे स्पष्ट केल्याचे समजते. यावर ‘त्यांच्यावर कारवाई करणार कीनाही,’ अशी विचारणा शरद पवार यांनी केली असता, त्याबाबत ‘प्रदेश’कडून निर्णय घेतला जाईल, असे आवाडे यांनी स्पष्ट केल्याचे समजते.त्यातूनच आजºयातील जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी यांनाही पवार यांनी भेटायला बोलाविले असल्याचे समजते.पर्यायाची चाचपणीमाजी आमदार पी. एन. पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून आमदार सतेज पाटील यांच्यामुळे कितपत नुकसान होऊ शकते याची माहिती घेऊन त्याला पर्याय काय दिला पाहिजे, याची ही चाचपणी पवार यांनी केली. एकीकडे राष्ट्रीय, राज्य पातळीवर दोन्ही काँग्रेस एकत्रित येऊन काम करीत असताना केवळ स्थानिक संदर्भ घेऊन पक्षविरोधी काम करीत असेल, तर त्यांच्याबाबतीत कडक भूमिका स्वीकारण्याची सूचना संबंधितांना दिल्याची चर्चायावेळी सुरू होती.

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार