शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन्हीकडे उमेदवार हीच पवार यांची डोकेदुखी : कोल्हापूर-सातारामधील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:04 IST

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या कोल्हापूर आणि सातारा या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने हुकमी विजयाच्या आहेत; परंतु तिथे विद्यमान खासदार अनुक्रमे धनंजय महाडिक व उदयनराजे भोसले यांना पक्षातूनच विरोध सुरू झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यादृष्टीने ती एक नवी डोकेदुखी झाली आहे; पण पवार या दोन्ही उमेदवारांना बदलण्याच्या

ठळक मुद्देविजयाची संधी; पण पक्षातूनच वाढता विरोधउदयनराजेभाजपकडे गेल्यास ही हक्काची जागा त्रासदायक ठरू शकेल, अशी भीती

विश्वास पाटील ।कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या कोल्हापूर आणि सातारा या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने हुकमी विजयाच्या आहेत; परंतु तिथे विद्यमान खासदार अनुक्रमे धनंजय महाडिक व उदयनराजे भोसले यांना पक्षातूनच विरोध सुरू झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यादृष्टीने ती एक नवी डोकेदुखी झाली आहे; पण पवार या दोन्ही उमेदवारांना बदलण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. सेफ गेमचे राजकारण ते करत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षापेक्षा आम्हीच मोठे आहोत असा या दोन्ही खासदारांचा भ्रम आहे. त्यामुळे ते पक्षाला जुमानत नाहीत. किंबहुना त्यांची भूमिकाही थेट पक्षाच्या विरोधात राहिली आहे. मुंबईत शनिवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खा. महाडिकांच्या विरोधात उघड तक्रार झाली.

कोल्हापुरात गेल्या निवडणुकीत पवार यांनी धनंजय महाडिक यांना संधी दिली. देशात काँग्रेसविरोधी लाट असतानाही दोन्ही काँग्रेसची एकत्रित मूठ, उमेदवार म्हणून महाडिक यांची प्रतिमा आणि महाडिक गटाची ताकद यामुळे ते विजयी झाले; परंतु लोकसभेला ज्यांचा पाठिंबा घेतला त्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याच विरोधात त्यांनी लगेच विधानसभेला रणशिंग फुंकले व त्यात पाटील यांचा पराभव झाला. त्यातून या दोन चांगले राजकीय करिअर असलेल्या नेत्यांमधील राजकीय संबंध अत्यंत टोकाला गेले आहेत. त्यामुळे आमदार पाटील हे या लोकसभेला खासदार महाडिक यांच्या पराभवासाठी ताकद पणाला लावणार हे स्पष्टच आहे; परंतु महाडिक यांना हा फक्त आमदार पाटील यांचाच नव्हे, तर स्वपक्षातूनही विरोध आहे. आज पक्ष एका बाजूला व महाडिक दुसºया बाजूला असे चित्र आहे.

पक्षाचे मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यातही राजकीय संघर्ष सुरू आहे. म्हणूनच तर खासदार महाडिक अध्यक्ष असलेल्या सोलापूर जिल्ह्णातील भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत चक्क मुश्रीफ यांच्या निषेधाचा ठराव झाला व त्याची प्रतिक्रिया म्हणून मुरगूडला महाडिक यांचा निषेध झाला. पक्षातूनच असा विरोध असूनही पवार या वेळेला कोल्हापूरचा उमेदवार बदलतील का ? याचे उत्तर नाही असेच आहे. कारण बदलूनही उमेदवारी द्यायची कुणाला हा प्रश्न आहेच शिवाय महाडिक यांनी खासदार म्हणून चांगली छाप पाडली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांचीच समजूत काढून महाडिक यांनाच बळ द्यायचे धोरण पवार यांचे दिसते. महाडिक यांनी तर पक्ष कोणता हे मला माहीत नाही; परंतु खासदार मीच होणार, असे जाहीर केले आहे. म्हणजे मी स्वत:च्या मेरिटवर निवडून येतो, मला पक्षाची गरज नाही असाच त्यांचा होरा दिसतो. त्यांच्या या पक्षाला फाट्यावर मारण्याच्या भूमिकेमुळेच पक्ष त्यांच्यापासून बाजूला गेला आहे.

असेच चित्र सातारा लोकसभा मतदारसंघातही दिसते. तिथे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीस पक्षातूनच टोकाचा विरोध आहे. तिथेही पक्ष एका बाजूला व खासदार दुसºया बाजूला, अशी विभागणी झाली आहे. सहापैकी चार ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत व त्यांचा विद्यमान खासदारांना विरोध आहे. उदयनराजेंचे हुकूमशाहीसारखे वागणे पक्षाच्या नेत्यांना मान्य नाही.

या निवडणुकीत शरद पवार यांच्यापुढे त्यांच्याऐवजी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रामराजे निंबाळकर असे उमेदवाराचे पर्याय आहेत. पक्षाची जिल्ह्णाच्या राजकारणावर पकड आहे; परंतु पवार उमेदवार बदलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कारण उदयनराजेभाजपकडे गेल्यास ही हक्काची जागा त्रासदायक ठरू शकेल, अशी भीती त्यांना वाटते.उमेदवारी द्यायची कुणालापक्षातूनच विरोध असूनही पवार या वेळेला कोल्हापूरचा उमेदवार बदलतील का ? याचे उत्तर नाही असेच आहे. कारण बदलूनही उमेदवारी द्यायची कुणाला हा प्रश्न आहेच.

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले