शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नातवांमुळे पवार आजोबांची पंचाईत : दिवाकर रावते यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 16:54 IST

राजकारणातील दोस्तीच्या इतके आहारी आपण गेलेलो असतो की ती सोडवत नाही. आई वडीलांनी हाक मारली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण या दोस्तीत गुंतलेलो असतो. परंतु या दोस्तीमुळे राजकीय अडचणी निर्माण होतात. हे पक्षासाठी हानिकारक आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जनतेचा विश्वास संपादन करावा यश आपोआप तुमच्या मागे येर्ईल, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे केले.

ठळक मुद्देदोस्तीच्या आहारी जाऊ नका;अडचण होईल: दिवाकर रावतेशिवसेना गटप्रमुखांचा मेळावा : जनतेचा विश्वास संपादन केल्यावर यश मागे येईल

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एका नातवासाठी माढ्यातून माघार घेतली. परंतु आता दुसरा नातू उठून बसला असुन आजोबा माझे काय? असे म्हणत आहे. त्यामुळे या नातवांमुळे पवार आजोबांची चांगलीच पंचाईत झाल्याचा टोला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे लगावला.शाहू मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण हॉल येथे शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, मुंबईच्या माजी महापौर श्रध्दा जाधव, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, महिला जिल्हाध्यक्षा शुभांगी पोवार आदींची होती.

कोल्हापूरातील शाहू मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉल येथे मंगळवारी आयोजित शिवसेनेच्या गटप्रमुख मेळाव्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी, गटप्रमुख उपस्थित होते.(छाया : दीपक जाधव)मंत्री रावते म्हणाले, राजकारणातील दोस्तीच्या इतके आहारी आपण गेलेलो असतो की ती सोडवत नाही. आई वडीलांनी हाक मारली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण या दोस्तीत गुंतलेलो असतो. परंतु या दोस्तीमुळे राजकीय अडचणी निर्माण होतात. हे पक्षासाठी हानिकारक आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जनतेचा विश्वास संपादन करावा यश आपोआप तुमच्या मागे येर्ईल, असे आवाहन रावते यांनी येथे केले.

येणारा काळ हा पुन्हा शिवसेना-भाजपचा असेल अशी स्थिती सद्या आहे. प्रत्येक शिवसैनिकाने दहा घरात प्रचार केल्यास उमेदवार निवडून येण्यास काहीच अडचण नाही. प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाची पताका फडकविण्यासाठी शिवसैनिकांनो सज्ज व्हा.

यावेळी दुधवडकर, संजय पवार, आ. नरके , आ. आबिटकर, संजय घाटगे यांची भाषणे झाली,  ते म्हणाले, उच्चांकी मतदान देऊन संजय मंडलिकांना निवडून आणून ‘मातोश्री’वर नेऊ. एक शिवसैनिक म्हणून पक्षाच्या आदेशाने काम करु. यावेळी रवी चौगुले, मनजित माने, वीरेंद्र मंडलिक, संग्राम कुपेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, कमलाकर जगदाळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.क्षीरसागर, इंगवले अनुपस्थितशिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर व शहरप्रमुख रविकिरण इंगवले हे अनुपस्थित होते. या दोघांच्या अनुपस्थितीबाबत मेळाव्याच्या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये दबक्या आवाजात कुजबूज सुरु होती. हे दोघे जाणीवपूर्वक आले नाहीत की अन्य कामात व्यस्त असल्याने ते येऊ शकले नाहीत. हे न कळाल्याने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.साटेलोटे करणाऱ्यांचा शोध घ्यागेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते कुणामुळे व कुठे गेली याचा शोध घेऊन साटेलोटे करणाऱ्यांची माहिती घेण्याची गरज आहे. दोषींना शिक्षा व्हायलाच पाहीजे, तरच संघटना टिकेल, असे संजय पवार यांनी सांगितले.

कोल्हापूर म्हणजे ‘मंडलिक’कोल्हापर म्हणजे मंडलिक अशी ओळख स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला  होती. सत्ताधारी पक्षाचे मंत्री व खासदार असतानाही एखादी गोष्ट अयोग्य असली तर प्रसंगी स्वपक्षियांशीच संघर्षाची भूमिका त्यांनी घेतल्याचे रावते यांनी सांगितले. यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

 

 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर