शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाटील पिता-पुत्राच्या लॉकरची झडती

By admin | Updated: November 19, 2016 01:07 IST

मंत्रालयातील जलसंपदा विभागात मुख्य अभियंता व सहसचिवपदावर सुरेश पाटील हे काम करीत होते.

कोल्हापूर : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता व सहसचिव सुरेश लक्ष्मण पाटील (रा. कसबा बावडा) यांच्यासह मुलगा विक्रांत यांच्या कोल्हापुरातील दोन बँकेतील लॉकरची झडती लाचलुचपत पथकाने शुक्रवारी घेतली. झडतीमध्ये लॉकर रिकामी असल्याचे दिसून आले. पाटील यांचे सदाशिव पेठ, पुणे येथील दोन आलिशान फ्लॅट सील करण्यात आले आहेत. आज, शनिवारपासून कागदोपत्री माहिती तपासण्याचे काम सुरू राहणार असल्याचे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले. मंत्रालयातील जलसंपदा विभागात मुख्य अभियंता व सहसचिवपदावर सुरेश पाटील हे काम करीत होते. त्यांनी २७ आॅक्टोबर १९८० ते ३१ मे २०१२ या कालावधीत चार कोटी १४ लाख २० हजार ७९९ रुपयांची अपसंपदा मिळविली आहे. त्यामुळे गुरुवारी कोल्हापूरसह पुणे, सोलापूर येथे घर व भूखंड, सांगली येथे भूखंड व इतर मालमत्तेच्या ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून मालमत्तेची झडती घेतली. त्यामध्ये ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ६८.११ टक्के उत्पन्न मिळविले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. संशयित सुरेश पाटील, पत्नी विद्या, मुलगा विक्रांत यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी शाहूपुरीतील कराड अर्बन बॅकेमध्ये पाटील यांचे लॉकर आहे, तर बँक आॅफ इंडिया शाखा, शाहूपुरीमध्ये मुलगा विक्रांत याचे लॉकर आहे. या दोन्ही लॉकरची झडती घेतली असता ती रिकामी होती. पाटील यांचे कोल्हापुरात स्टेशन रोड परिसरातील रेडियट हॉटेलमध्ये भागीदारी आहे. कोल्हापुरात दोन बंगले, कसबा बावडा व कागल येथील शेतजमीन, सोलापूरमध्ये आर.सी.सी. घर, वेळापूर (ता. माळशिरस) मध्ये तीन शेतजमिनी, सांगली येथील सांगलीवाडी रोडवर २६ गुंठे रिकामा प्लॉट, आदी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. नातेवाईक, मित्रपरिवाराची होणार चौकशी सुरेश पाटील यांनी नातेवाईक, तसेच मित्रांच्या नावावर काही मालमत्ता घेऊन ठेवली आहे का? त्याच बँक खात्याद्वारे ज्या व्यक्तींशी मोठे व्यवहार झाले आहेत, त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक आफळे यांनी सांगितले.