शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘बिनदाती’त पाटील यांची बैलजोडी सदृढ

By admin | Updated: July 12, 2017 00:45 IST

‘बिनदाती’त पाटील यांची बैलजोडी सदृढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडहिंग्लज : येथील शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे आयोजित सदृढ बैलजोडी स्पर्धेत बिनदाती गटात प्रणव पाटील (गडहिंग्लज), दाती गटात संजय संकपाळ (मुत्नाळ), तर बैलजोडी गटात अरुण भोसले (गडहिंंग्लज) यांच्या बैलजोडींनी प्रथम क्रमांक पटकाविला. सलग १७ व्या वर्षी भरविण्यात आलेल्या स्पर्धेत यावर्षी ३० बैलजोड्यांनी भाग घेतला. बँडबाज, लेझीम, झांजपथक, बेंजोंच्या निनादात रिमझिम पावसातही तब्बल ७ तास मिरवणुका काढण्यात आल्या. सर्व बैलजोड्या सवाद्य मिरवणुकीने स्पर्धेच्या ठिकाणी शिवाजी चौकात आणल्या. त्याठिकाणी तज्ज्ञ शेतकरी व पंचांनी बैलजोड्यांचे परीक्षण केले. शहरातील सर्व रस्ते हुर्रमंजात न्हाऊन निघाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी सीमाभागातील हजारो शौकीन व शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.नेहरू चौकात नगरपालिकेतर्फे कासरा, गांधी टोपी, श्रीफळ व पानविडा देऊन प्रत्येक बैलजोडी मालकाचे नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी, मुख्याधिकारी संजय केदार व नगरसेवकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.गटनिहाय अनुक्रमे निकाल असा - बिनदाती गट - प्रणव पाटील (गडहिंग्लज), बाळेश नाईक (बसर्गे), निळकंठ पुळमुळे (भडगाव), सत्याप्पा मोकाशी (खणदाळ), श्रीकांत खोत (गडहिंग्लज).दाती गट - संजय संकपाळ (मुत्नाळ), आनंदा पाटील (हनिमनाळ), नारायण यडूरकर (बसर्गे), वैभव पाटील (गडहिंग्लज), दर्शन पाटील (नूल).बैलजोडी गट - अरुण भोसले (गडहिंग्लज), मधुकर गुरव (बेकनाळ), बाबूराव कोरी (भडगाव), अशोक खवणे (नूल), भूषण नेवडे (गडहिंग्लज).प्रत्येक गटातील विजेत्यांना अनुक्रमे २०,०००, १५,०००, १०,०००, ५०००, ३००० अशी रोख बक्षिसे देण्यात आली. गडहिंंग्लज कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे, डीवायएसपी रमेश पाटील, पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर यांनी आभार मानले.