शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षपदासाठी पाटील-मोरे लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 00:51 IST

जोरदार रस्सीखेच : राष्ट्रवादी-जनसुराज्य एकमेकांच्या विरोधात

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप व दोन्ही कॉँग्रेसमध्ये चढाओढ सुरू असताना उपाध्यक्ष पदासाठीही तेवढीच रस्सीखेच राहणार आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून उपाध्यक्ष पदासाठी सतीश पाटील (गिजवणे) व ‘भाजता’कडून जनसुराज्य पक्षाचे प्रा. शिवाजी मोरे (सातवे) यांच्यातच लढत पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेसह सर्वच संस्थांत एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेत जाणारे राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात राहण्याची शक्यता बळावली आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उपाध्यक्षसह विषय समिती सभापती पदावर समझोता झाला असून, उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीला मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून उपाध्यक्ष पदासाठी युवराज पाटील, सतीश पाटील, जयवंत शिंपी, सविता भाटले यांच्या नावाची चर्चा झाली. आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी गडहिंग्लजमध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे तिथे राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी सतीश पाटील यांचे नाव शेवटच्या क्षणी पुढे येऊ शकते. ‘भाजता’ आघाडीत उपाध्यक्षपद जनसुराज्य व आमदार चंद्रदीप नरके गटाला देण्याबाबत चर्चा झाली. ‘जनसुराज्य’चे सहा सदस्य असल्याने पहिल्या टप्प्यात त्यांना उपाध्यक्षपद देण्यावर एकमत झाल्याचे समजते. नरके यांचे तीन सदस्य आहेत, त्यातील दोन महिला असल्याने सर्जेराव पाटील यांच्यासाठी ते आग्रही राहू शकतात. ‘जनसुराज्य’कडून सर्जेराव पाटील-पेरीडकर, शंकर पाटील (कोतोली) व शिवाजी मोरे (सातवे) यांची नावे पुढे येतात. पाटील जिल्हा बॅँकेचे संचालक असल्याने मोरे यांचे नाव पुढे आहे. ‘बांधकाम’साठी चढाओेढउपाध्यक्ष पदानंतर बांधकाम सभापती पदासाठी दोन्हीकडे चढाओढ सुरू आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून हे पद शिवसेनेला आणि ‘भाजता’कडूनही शिवसेनेला (चंद्रदीप नरके गट) मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.