शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण वाढले; मात्र रुग्णवाहिकांचा तुटवडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:38 IST

गणेश शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने आपत्कालीन काळात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी ...

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने आपत्कालीन काळात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी २०१४ मध्ये १०८ नंबरची रुग्णवाहिका सेवा सुरू केली. त्यामुळे दुर्गम, डोंगराळ तसेच अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळू लागल्या. त्यामुळे हजारो रुग्णांना जीवदान मिळाले; पण ३८ लाख लोकसंख्येच्या कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ३६ रुग्णवाहिका आहेत.जिल्ह्यात ही सेवा सुरू होऊन शनिवारी म्हणजे प्रजासत्ताकदिनी पाच वर्षे पूर्ण झाली. जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांनी २६ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत एक लाख ३१ हजार रुग्णांना सेवा दिली.रस्त्यांवरील अपघात, मारामारी, प्रसूती, विजेचा धक्का, मोठे अपघात, गंभीर दुखापत, हृदयाचे आजार, भाजणे, विषबाधा या प्रमुख रुग्णांसह सर्व प्रकारच्या रुग्णांना आपत्कालीन काळात ही वैद्यकीय सेवा १०८ रुग्णवाहिका देते. २६ जानेवारी २०१४ ला जिल्ह्यात ही सेवा सुरू झाली. पहिल्यांदा ३४ रुग्णवाहिका, त्यानंतर गडहिंग्लज व नरसोबावाडी येथे दोन रुग्णवाहिका देऊन ती संख्या ३६ वर पोहोचली. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे ३८ लाख होती. त्यानंतर या आठ वर्षांत लोकसंख्येत वाढ होऊन रुग्णसंख्याही वाढली आहे. कोल्हापूर शहरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) व सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे प्रत्येकी एक, इचलकरंजीत दोन; तर ग्रामीण भागात म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी ३२ रुग्णवाहिका असून, एकूण ३६ रुग्णवाहिका आहेत. यात बेसिक लाईफ सपोर्ट व अ‍ॅडव्हान्स सपोर्ट लाईफच्या रुग्णवाहिका आहेत. साधारणत: एक ते सव्वा लाख लोकसंख्येला एक रुग्णवाहिका असे गणित आहे. सध्या शहराची लोकसंख्या जवळपास साडेसहा लाख आहे. शहरात आणखी दोन १०८च्या रुग्णवाहिका वाढवाव्यात, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांसह शहरवासीयांमधून होत आहे.समितीवर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रणमहाराष्ट्र शासन व भारत विकास ग्रुप इंडिया लि.तर्फे (बी.व्ही.जी.) १०८ नंबर रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. त्यात दोन प्रशासकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, आरोग्य अधिकारी, आदी सदस्य आहेत.