शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाईपलाईनचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 26, 2014 00:42 IST

‘जीकेसी’ला ठेका : पुनर्मूल्यांकनापेक्षा ४.५ कोटी अधिक; ६५ कोटींची आगाऊ भरावे लागणार

कोल्हापूर : कोल्हापूर शहरवासीयांचे तीन दशकांचे स्वप्न असलेली थेट पाईपलाईन योजना अखेर खऱ्या अर्थाने मार्गी लागली. आज, बुधवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याशी झालेल्या बैठकीत ‘जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेड’ या कंपनीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केलेल्या पुनर्मूल्यांकनापेक्षा साडेचार कोटी जादा दराने काम देण्याचे ठरले. यामुळे ही योजना आता ४८९ कोटींवर गेली आहे. मंजूर रकमेपेक्षा ६५ कोटी रुपयांची अधिकची तरतूद महापालिकेला करावी लागणार आहे. येत्या महिन्याभरात योजनेचा नारळ फुटणार असून, प्रत्यक्ष कामास पावसाळ्यानंतर म्हणजे डिसेंबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. हा विषय मंजुरीसाठी येत्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मांडण्यात येणार असल्याचे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. शहरवासीयांना पुढील ५० वर्षे स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे याचा विचार करूनच ४२३ कोटी खर्चाची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना आखली आहे. योजना दोन वर्षांपूर्वी मंजूर झाल्याने योजनेच्या वाढीव खर्चामुळे काम घेण्यासाठी कंपन्या पुढे येत नव्हत्या. महापालिके ने काढलेल्या फेर निविदेत लार्सन अँड टुब्रो लिमिटेडने २१.१० टक्के, जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेडने १८.९ टक्के व मेघा इंजिनिअरिंगने २०.६५ टक्के निविदेपेक्षा जादा दराने काम करण्याची तयारी दर्शविली होती. सर्वांत कमी म्हणून ‘जीकेसी’ बरोबर गेले महिनाभर वाटाघाटी सुरू होत्या.वाटाघाटीतून मार्ग निघेना म्हणून महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वी योजनेचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मूल्यांकन करून घेतले. वाढलेल्या बाजारमूल्यांनुसार ४२३ कोटींची ही योजना ४८४ कोटी १३ लाख रुपयांवर गेली आहे. मागील दोन बैठकीत महापालिका व कंपनी यांच्यात पाच कोटींवरून घासाघासी सुरू होती. अखेर ‘एमजेपी’च्या मूल्यांकनाच्या ०.९५ टक्के वाढीव दराने काम करण्यावर महापालिका व ‘जीकेसी’ यांच्यात सहमती झाली.तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यापेक्षा ‘जीकेसी’ला चर्चेद्वारे कमीतकमी रकमेवर काम करण्याची योजना महापालिक ा प्रशासनाने आखली. आजच्या बैठकीत कंपनी ४८९ कोटी ७५ लाख रुपयांवर काम करण्यास तयार झाली. बैठकीसाठी ‘जीकेसी’चे संचालक अमित कामत व जलअभियंता मनीष पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)