शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पितृपंधरवड्याचा धसका

By admin | Updated: October 7, 2015 00:34 IST

सर्व्हर डाऊनमुळे गोंधळ : दिवसभरात एकही अर्ज दाखल नाही

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून ज्या दिवसाची प्रतीक्षा होती, तो दिवस प्रत्यक्षात मंगळवारी उजाडला खरा; पण सुरू असलेल्या पितृपंधरवड्याने सुरुवातीला अडसर आणत कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहावर पाणी फिरविले. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी या पितृपंधरवड्याचा धसका घेत एकानेही आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरी पहिल्याच दिवशी ‘खो’ बसला. त्यातच दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व्हर डाऊन झाल्याने अधिकृत संकेतस्थळ खुले झाले नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आठव्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. दि. ६ ते १३ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. परंतु, निवडणुकीची सुरुवातच पितृपंधरवड्यात झाल्याने पुरोगामी शहरातील इच्छुक उमेदवार, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले. पितृपंधरवडा अशुभ मानण्याची समाजाची रीत आहे. या दिवसात कोणतेही शुभ काम केले जात नाही. याचा अनुभव मंगळवारी आला. कोणीही इच्छुक उमेदवार निवडणूक (पान १ वरून) कार्यालयाकडेही फिरकला नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना उमेदवारांची प्रतीक्षा लागून राहिली होती. सातही क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांत पहिला दिवस तसा निवांत गेला. निवडणुकीचे कामकाज सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावे म्हणून सात क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही कार्यालयांत किरकोळ गैरसोयी असल्या तरी त्या दूर करताना कर्मचाऱ्यांची होणारी धावपळ स्पष्टपणे दिसत होती. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया जरी बंद राहिली तरी निवडणूक यंत्रणेतील अन्य कर्मचारी मात्र प्रभागनिहाय मतदार याद्यांमधील घोळ मिटवत बसल्याचे दिसत होते. मतदार याद्या, आचारसंहिता पथक, नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या याचा आढावा घेण्यात येत होता. संगणक यंत्रणा सुरळीतपणे कामकाज करते किंवा नाही, याची चाचपणी केली जात होती. उमेदवारी अर्ज भरणारी स्वतंत्र यंत्रणायंदा प्रथमच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आॅनलाईनवर भरायचे आहेत. ही बाब नवीन असल्याने उमेदवारी अर्ज भरताना काही चुका होऊ नयेत, म्हणून बहुतेक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज भरून देण्याची स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. त्यासाठी संगणक तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, तसेच या प्रक्रियेची माहिती असलेले अभ्यासक यांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेने महापालिकेसमोरील मध्यवर्ती कार्यालयात तीन संगणक संच ठेवले असून, त्यावर इंटरनेट सुविधा उपलब्ध केली आहे. वकिलांचीही या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांनी फक्त मध्यवर्ती कार्यालयात जाऊन संबंधितांना माहिती द्यायची आहे. उमेदवारी अर्ज भरल्यावर त्यांना स्थळप्रत देण्यात येणार आहे. ती त्यांनी त्यांच्या-त्यांच्या सोयीने १३ आॅक्टोबर, दुपारी ३ वाजेपर्यंत भरायची आहे. भाजप, ताराराणी, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना अर्थात महायुतीनेही जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये दोन संगणक तज्ज्ञांसह उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरून देण्याची सोय केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने तर हे काम एका खासगी संस्थेवर सोपविले आहे. पक्षाने एक फॉर्म तयार केला असून, तो उमेदवारांनी भरून द्यायचा आहे. त्याआधारे आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरले जातील आणि सर्व उमेदवारांना स्थळप्रत देण्यात येणार आहे. काँग्रेसच्या ५० उमेदवारांची यादी जाहीरकोल्हापूर : विद्यमान सभागृहातील एक माजी महापौर, दोन नगरसेवकांसह माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांचा भरणा असलेली काँग्रेस पक्षाच्या ५० उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी रात्री जाहीर झाली. जयश्री सोनवणे, श्रीकांत बनछोडे, इंद्रजित सलगर यांच्यासह अशोक जाधव, दिलीप पोवार, नंदकुमार सूर्यवंशी यांचाही यादीत समावेश आहे. / वृत्त २घटस्थापनेच्या मुहूर्तावर गर्दी उसळण्याची शक्यता सर्वच इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मंगळवारपासून पुढे सात दिवसांचा कालावधी मिळणार आहे. सुरुवातीलाच पितृपंधरवड्याची अडचण आली आहे. रविवारी सुटी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सोमवारी सर्वपित्री अमावस्या आहे. तोही दिवस असाच टाळला जाईल. त्यामुळे केवळ मंगळवारी घटस्थापनेचा दिवसच महत्त्वाचा असल्याने या दिवशी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.