शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

मजुरांच्या भरवशावरच पॅचवर्कचे काम

By admin | Updated: December 5, 2014 00:24 IST

हे खड्डे बुजविण्यासाठी गगनबावड्यापर्यंत मुरुमाचा वापर

प्रकाश पाटील - कोपार्डे -कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे पॅचवर्किंग सुरू आहे. तरीही रस्त्याची खड्ड्यातून मुक्तता झालेली नाही. मुठकेश्वरच्या पश्चिमेपासून लोघे किरवेपर्यंतचा रस्ता पूर्ण खराब झाला असून, यातून प्रवासी व मालवाहतूक करणारी वाहने अगदी जंप घेत मार्गक्रमण करताना दिसतात. हे खड्डे बुजविण्यासाठी गगनबावड्यापर्यंत मुरुमाचा वापर केला आहे. सध्या डी. वाय. पाटील साखर कारखाना, असळज ते गगनबावडा रस्त्यावर पॅचवर्किंगच्या कामाची सुरुवात केलेली असून, ज्या खड्ड्यात मुरुम व माती पावसाळ्यात टाकली गेली होती ती मजुरांच्या व जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करण्यात येत आहे. काम अनुभवी व तज्ज्ञ सुपरवाझरच्या देखरेखीखाली होणे आवश्यक आहे; मात्र या कामास ‘लोकमत’ प्रतिनिधींनी भेट दिली असता एकही शासकीय तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित नव्हती. येथील मजुरांना कामाबाबत समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.याच मार्गावर असळजजवळ म्हारकीची व्हाळ येथे एक अरुंद मोहरी आहे. या मोहरीला संरक्षक कठडे म्हणून लहान मोठ्या कमकुवत काठ्या लावून संरक्षक कठडा म्हणून वापर करण्याचा अजब प्रकार झाला आहे. येथून पुढे खोकुर्ले येथे रस्त्यामध्ये निम्मा रस्ता उंच, तर निम्मा किमा चार ते सहा इंच खाली, अशी पातळी बिघडलेला आहे. गेले तीस वर्षांपासून माझे या रस्त्यावर हॉटेल आहे. रात्रीच्या वेळी हा सुरक्षित मार्ग म्हणून आराम बसगाड्यांकडून प्राधान्याने याचा वापर होतो. मार्ग अत्यंत अरुंद तर आहेच, पण खड्डेही काही कमी होत नाहीत. दरवर्षी खर्च खड्ड्यातच जाताना दिसतोय.- किरण विष्णू पाटील, कळे, हॉटेल चालकट्रॅक्टर तळ कोकणात घेऊन नेहमी जातोय. कळेपासून गगनबावड्यापर्यंत पोहोचताना रस्त्यातील खड्ड्यांमुळे कंबरडे मोडले आहे. लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रयत्न करून रस्त्याला वैभव व दर्जा प्राप्त करून द्यावा.- प्रकाश बचाराम पाटील, ट्रॅक्टर चालकनियम धाब्यावरसर्वसाधारण शासनाच्या नियम व अटीप्रमाणे एक बाय एकच्या खड्ड्यासाठी किमान तीन किलो डांबर वापरण्याचे बंधन आहे. त्याआधी तो खड्डा संपूर्ण मातीमुक्त करावा लागतो; पण कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याच्या कामादरम्यान खड्ड्यातील माती साफ न करताच त्यामध्ये केवळ नाममात्र डांबर टाकून काम सुरू आहे. त्यामुळे हे भरलेले खड्डे पुन्हा उखडून त्या ठिकाणी जो खड्डा निर्माण होतो त्यामुळे तर पुन्हा वाहन चालकांची मोठी कुंचबणा होते.