शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट मिळणे आता सुलभ--- गुड न्यूज

By admin | Updated: January 28, 2016 00:43 IST

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पाऊल : अगोदर पासपोर्ट मग पडताळणी -

कोल्हापूर : पासपोर्ट मिळण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा व मारावे लागणारे हेलपाटे कमी करण्यासाठी पासपोर्ट देण्याच्या प्रक्रियेमध्ये तीन महत्त्वाचे बदल करण्यात आल्याने लोकांना पासपोर्ट मिळणे अधिक सुलभ झाले आहे. पुण्यातील पासपोर्ट विभागीय कार्यालयाचे अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी ही माहिती दिली. पुणे कार्यालय पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांसाठी आहे. सरासरी वर्षाला या कार्यालयातून पावणेतीन लाख लोकांना पासपोर्ट दिले जातात.पासपोर्टची सध्याची प्रक्रिया व बदल असे...1पासपोर्टसाठी सध्या पासपोर्ट कार्यालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रत्येकी दीड हजार रुपये शुल्क भरावे लागते. त्यानंतर पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आॅनलाईनच तारीख निश्चित करून दिली जाते. ही प्रक्रिया ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या सूत्रानुसार राबविली जाते. अडचण अशी होती की जी तारीख दिली जाईल त्याचदिवशी पुण्यास जाणे बंधनकारक असे. त्यादिवशी अडचण असेल तर नव्याने प्रक्रिया राबवावी लागे; परंतु आता त्याऐवजी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तुम्हाला एकाऐवजी पाच दिवसांचा पर्याय दिला जाईल. त्यापैकी कोणतीही एक तारीख तुम्ही निश्चित करून जाऊ शकाल.2पासपोर्टसाठी पोलीस खात्यांकडून जी चारित्र्य व गुन्हेविषयक पडताळणी केली जाते ही सगळी प्रक्रिया पोलीस कागदपत्रांच्या आधारे आतापर्यंत करत होते; परंतु आता परराष्ट्र व्यवहार विषयक मंत्रालयाने त्यासाठी खास मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. त्यामुळे ही सगळी माहिती या अ‍ॅपवर भरली जाणार असल्याने पोलीस पडताळणीचा दाखला लवकर मिळण्यास सोयीचे झाले आहे.3प्रचलित पद्धतीनुसार पोलीस चारित्र्य पडताळणीचा दाखला जमा झाल्याशिवाय पासपोर्ट दिला जात नाही. यामध्ये आता महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ज्यांनी पासपोर्टसाठी अर्ज केला आहे, त्यांचे आधारकार्ड, भारत निवडणूक आयोगाने दिलेले निवडणूक कार्ड आणि पॅनकार्ड असेल तर त्याच्या अधीन राहून पासपोर्ट दिला जाणार आहे. सद्य:स्थितीत पोलीस पडताळणीसाठी किमान २१ ते ४० दिवस लागतात. आता हा कालावधी कमी होणार आहे; परंतु त्यासाठी तुम्हाला आॅनलाईन फॉरमॅटमध्ये प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल. पोलीस पडताळणीचा दाखला मुदतीत न दिल्यास मात्र तुमचा पासपोर्ट जप्त करण्यात येईल.